मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला—

  2. इस्राएल समाजाला मिळालेला अर्धा वाटा याप्रमाणे होता—3,37,500 मेंढरे,

  3. 36,000 गुरे,

  4. 30,500 गाढवे

  5. आणि 16,000 लोक.

  6. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते.

  7. नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले

  8. आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही.

  9. म्हणून आम्ही आम्हाला लुटीतून जे सोन्याचे दागिने मिळाले त्यातून तोडे, कड्या, अंगठ्या, कुंडले व माळा; आमच्यासाठी प्रायश्चिताचे अर्पण म्हणून याहवेहसमोर आणले आहेत.”

  10. मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले.

  11. हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार यांच्याकडून स्वीकारलेले सोने जे मोशे व एलअज़ार याजकाने याहवेहला भेट म्हणून सादर केले, त्याचे वजन 16,750 शेकेल इतके भरले.

  12. प्रत्येक सैनिकाने स्वतःसाठी लूट घेतली होती.

  13. मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.

  14. रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत.

  15. म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले,

  16. “अतारोथ, दिबोन, याजेर, निमराह, हेशबोन, एलिआलेह, सेबाम, नबो व बेओन;

  17. हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.”

  18. ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.”

  19. मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?

  20. याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता?

  21. मी तुमच्या पूर्वजांना कादेश-बरनेआपासून देश हेरायला पाठवले तेव्हाही त्यांनी असेच केले होते.

  22. अष्कोलच्या खोर्‍यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले.

  23. त्या दिवशी याहवेहचा क्रोध भडकला आणि त्यांनी ही शपथ वाहिली:

  24. ‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;

  25. कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ मात्र तो पाहतील, कारण त्यांनी याहवेहला पूर्ण हृदयाने अनुसरले.’