Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने: Passover first commemorated
Passover first commemorated बद्दल वचने
इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले,
“इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा.
नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.”
तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.
त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.