मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने: Worship of God celebrated during

15 वचने · 177 पैलू

Worship of God celebrated during बद्दल वचने

  1. मग त्याने इस्राएलचे तरुण पुरुष पाठविले व त्यांनी याहवेहला होमार्पणे व गोर्‍हे अर्पून शांत्यर्पण केले.

  2. मोशेने त्यातील अर्धे रक्त वाटीत घेतले व अर्धे वेदीवर शिंपडले.

  3. मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.”

  4. मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.”

  5. “दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे.

  6. एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.

  7. पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस अर्पण करावे.

  8. संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.

  9. “हे होमार्पण येणार्‍या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.

  10. त्याने सभामंडपामध्ये मेजासमोर, निवासमंडपाच्या दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवला

  11. आणि याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे याहवेहसमोर दिवे लावले.

  12. मग मोशेने सभामंडपात, पडद्याच्या समोर सोन्याची वेदी ठेवली

  13. व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला.

  14. मग त्याने निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराला पडदे लावले.

  15. मग मोशेने निवासमंडपाच्या, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होमार्पणाची वेदी ठेवली व त्यावर होमार्पण व अन्नार्पण केले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.