Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने: Plague sent
Plague sent बद्दल वचने
पण दुसर्याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”
लवकरच तिथे मोशे व अहरोनाच्या विरुद्ध समुदाय जमला. तेवढ्यात एकाएकी सभामंडपावर मेघ उतरून याहवेहचे गौरव पसरल्याचे त्यांना दिसले.
मोशे आणि अहरोन सभामंडपाच्या दाराशी येऊन उभे राहिले;
आणि याहवेह मोशेला म्हणाले,
“या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले.
नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”