मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने: Flesh promised

12 वचने · 177 पैलू

"Journey of Israel Through The Desert" साठी शोधा

Flesh promised बद्दल वचने

  1. प्रत्येक घराण्यातील लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून रडत होते आणि याहवेहचा त्यांच्यावर अतिशय क्रोध आला होता त्यामुळे मोशे अस्वस्थ झाला.

  2. मोशेने याहवेहला विचारले, “तुमच्या सेवकावर हे कष्ट तुम्ही का आणले? तुम्ही असंतुष्ट व्हावे असे मी काय केले की तुम्ही या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर लादावे?

  3. मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता?

  4. या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’

  5. मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे.

  6. तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.”

  7. “लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल.

  8. तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस,

  9. परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”

  10. पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’

  11. गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”

  12. याहवेहने मोशेला उत्तर दिले, “याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील.”