मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मोशे याहवेहला म्हणाला,

  2. “याहवेह परमेश्वर, जे सर्व जीवधार्‍यांना श्वास देतात, त्यांनी या समाजावर कोणा एकाची नेमणूक करावी

  3. की त्याने त्यांच्यापुढे बाहेर जावे व आत यावे, जो त्यांना बाहेर नेईल व आत आणेल, जेणेकरून याहवेहचे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे होणार नाहीत.”

  4. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “नूनाचा पुत्र यहोशुआ, ज्या पुरुषामध्ये पुढारीपणाचा आत्मा वसतो, त्याला घे व त्याच्यावर आपला हात ठेव.

  5. एलअज़ार याजक व संपूर्ण मंडळीसमोर त्याला उभे करून त्यांच्या समक्षतेत त्याची नेमणूक कर.

  6. तुझे काही अधिकार त्याला दे म्हणजे सर्व इस्राएली समाज त्याचे आज्ञापालन करतील.

  7. त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”

  8. याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुआला एलअज़ार याजक व सर्व समाजापुढे उभे केले.

  9. आणि याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात यहोशुआवर ठेवून त्याची नेमणूक केली.

  10. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  11. “इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”

  12. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील.

  13. इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक हजार पुरुषांना युद्धासाठी पाठवा.”

  14. तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले.

  15. एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासाने आपल्याबरोबर पवित्रस्थानातील साहित्य व इशारा देण्यासाठी कर्णे घेतले होते, त्याच्यासह मोशेने प्रत्येक गोत्रातील एक हजार पुरुषांना युद्धात पाठवले.

  16. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले.

  17. ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.

  18. इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले.

  19. मिद्यानी लोक ज्या नगरांमध्ये स्थायिक होते त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या.

  20. त्यांनी सर्व लोक व जनावरे यासह सर्व लूट व मालमत्ता घेतली,

  21. आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.

  22. मोशे, एलअज़ार याजक आणि समाजाचे सर्व पुढारी त्यांना भेटण्यास छावणीबाहेर गेले.

  23. पण सेनाधिकारी जे हजारांवरचे सरदार व शंभरांवरचे सरदार—जे युद्धावरून परतले त्यांच्यावर मोशे रागावला.

  24. मोशेने त्यांना विचारले, “तुम्ही सर्व स्त्रियांना जिवंत राहू दिले काय?

  25. त्यांनीच बलामाच्या सल्ल्यानुसार पेओरच्या प्रकरणात इस्राएली लोकांना याहवेहशी अविश्वासूपणा करण्यास भाग पाडले आणि याहवेहच्या लोकांना पीडेने मारले.