मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपल्याच कर्मानी ते भ्रष्ट झाले; आणि त्यांचे कृत्य व्यभिचारी ठरले.

  2. बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.

  3. असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली आणि त्यांचा आक्रोश ऐकला;

  4. त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.

  5. त्यांना बंदिवासात नेलेल्या शत्रूंच्या मनात त्यांच्याकरिता कृपा उत्पन्न केली.

  6. मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले, मोशे आणि त्यांच्या लोकांचे दिवस— ज्यांनी त्यांच्या मेंढपाळासह पूर्ण कळपाला समुद्रमार्गी बाहेर काढले, ते कुठे आहेत? त्यांच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठविणारे ते कुठे आहेत?

  7. मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,

  8. समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले? उघड्या रानात असणार्‍या घोड्यांप्रमाणे, ते कधी अडखळले नाहीत;

  9. जशी गुरे सपाटीवर जातात, तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले.