- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
ओसाड भूमीत त्यांनी आपल्या उत्कट इच्छांना मोकळी वाट करून दिली; वाळवंटात परमेश्वराची परीक्षा पाहिली.
परमेश्वराने त्यांच्या मागण्या पुरविल्या, परंतु जीव झुरणीस लावणारा रोगही त्यांच्याकडे पाठविला.
तंबूत असताना मोशे आणि याहवेहचा अभिषिक्त अहरोन यांच्या विरुद्धही त्यांचा हेवा वाढला.
मग पृथ्वी उघडली आणि तिने दाथानाला गिळून टाकले; अबीराम व त्याच्या समुहाला दफन केले.
आणि त्यांच्या अनुयायांवर अग्निपात झाला; दुष्ट माणसांना भस्म करण्यात आले.
होरेब येथे त्यांनी एका वासराची मूर्ती घडविली, आणि त्या धातूच्या मूर्तीची आराधना केली.
परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल गवत खाणार्या बैलाच्या प्रतिमेशी केली.
त्या परमेश्वराला ते विसरले, ज्यांनी त्यांना सोडविले, इजिप्त देशात महान चमत्कार केले,
हामच्या भूमीत आश्चर्यकर्म केले, आणि तांबड्या समुद्राकाठी चमत्कार केले.
मग ते म्हणाले की ते त्यांचा नाश करतील— जर खुद्द त्यांनी निवडलेला पुरुष मोशे, मध्ये उभा राहिला नसता तर, त्यांनी आपला क्रोध न आवरता त्या लोकांचा नाश केला असता.
वचनदत्त देशास त्या लोकांनी तुच्छ लेखले; त्यांनी दिलेल्या अभिवचनांवर त्यांचा विश्वास नव्हता.
त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, आणि याहवेहची आज्ञा झिडकारली.
तेव्हा परमेश्वराने आपले हात उंचावून शपथ घेतली, की या रानात ते त्यांना नष्ट करतील.
त्यांच्या वंशजांना दूरदूरच्या राष्ट्रात पाठवतील, आणि समस्त पृथ्वीवर त्यांना विखरून टाकतील.
त्यांनी बआल-पौराची पूजा-अर्चना केली आणि निर्जीव दैवताला यज्ञ अर्पिले.
या सर्व दुष्टकर्मांनी त्यांनी याहवेहला क्रुद्ध केले, म्हणून त्यांच्यामध्ये मरी पसरली.
तेव्हा फिनहास मध्यस्थ म्हणून उभा राहिला, आणि मग मरी थांबली.
फिनहासाच्या या चांगल्या कृत्यामुळे त्याची पिढ्यान् पिढ्या सर्वकाळ नीतिमानात गणना होईल.
मरीबाह जलाशयाजवळ देखील त्यांनी याहवेहला राग आणला, आणि त्यांच्यामुळेच मोशेवर संकट आले;
परमेश्वराच्या आत्म्याविरुद्ध त्यांनी बंडखोरी केली, आणि मोशे संतापला व अविचारीपणाने बोलला.
याहवेहनी तशी आज्ञा केली असूनही, त्यांनी इतर राष्ट्रातील लोकांचा नाश केला नाही.
उलट ते अन्य राष्ट्रात मिसळले, आणि त्यांच्या प्रथा आत्मसात केल्या.
त्यांनी त्यांच्या मूर्तींची आराधना केली, त्यामुळे ते पाशात अडकले.
त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या खोट्या दैवतांना अर्पण केले.
निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.