मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली.

  2. योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते:

  3. मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.

  4. हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ;

  5. अस्रिएलपासून अस्रिएली कूळ; शेखेमपासून शेखेमी कूळ;

  6. शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.

  7. (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)

  8. ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.

  9. एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ.

  10. शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.

  11. हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली.

  12. बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: बेलापासून बेलाई कूळ; आशबेलपासून अशबेली कूळ; अहीरामपासून अहीरामी कूळ;

  13. शफूफामपासून शूफामी कूळ; हूफामपासून हूफामी कूळ.

  14. आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: आर्दाचे आर्दी कूळ; नामान द्वारे नामीनी कूळ.

  15. ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.

  16. दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ.

  17. ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली.

  18. आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ;

  19. आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ.

  20. आशेरला सेराह नावाची कन्या होती.

  21. ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.

  22. नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;

  23. येसेरपासून येसेरी कूळ; शिल्लेमपासून शिल्लेमी कूळ.

  24. ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.

  25. इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली.