- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.
मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले.
म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले.
मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर असे ठेवले.
आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले.
त्यांनी हशमोनाह सोडले आणि मोसेरोथ येथे तळ दिला.
त्यांनी मोसेरोथ सोडले आणि बेने-याकन येथे तळ दिला.
त्यांनी बेने-याकन सोडले आणि होर-हग्गीदगाद येथे तळ दिला.
योसेफाच्या वंशाच्या कुळातील, मनश्शेहचा पुत्र माखीरचा पुत्र गिलआदच्या कुटुंबाचे कुलप्रमुख मोशे व पुढारी, म्हणजे इस्राएली कुटुंबाच्या पुढाऱ्यांपुढे येऊन बोलले.
ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे.
परंतु त्यांनी जर इस्राएलातील इतर गोत्रातील पुरुषांशी लग्न केले, तर त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या वतनातून काढून ज्या गोत्रात त्या लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या वतनाचा भाग काढून घेतला जाईल.
आणि जेव्हा इस्राएल लोकांचे योबेल वर्ष येईल, तेव्हा त्यांचे वतन ज्या गोत्रात ते लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल आणि त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या गोत्रातून काढून घेतले जाईल.”
नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे.
सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा.
इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे.
इस्राएली लोकांतील कोणत्याही गोत्रातील ज्या प्रत्येक मुलीला वतन मिळाले असेल, तिने आपल्या पित्याच्या गोत्राच्या कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह करावा, यासाठी की प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे वतन मिळेल.
कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.”
त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे.
कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्यांप्रमाणे अगणित केली आहे,
याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो!
तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल?
तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”
तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.”
म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.
तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ.