- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Jacob बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.
पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”
त्याने आपले स्वप्न आपल्या भावांबरोबर आपल्या वडिलांनाही सांगितले, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला धमकावून विचारले, “हे काय बोलतोस? मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्याकडे येऊन तुला भूमीपर्यंत लवून नमन करणार आहोत काय?”
या कारणामुळे त्याच्या भावांचा द्वेष अधिक तीव्र झाला; परंतु त्याच्या वडिलांनी ही बाब आपल्या मनात ठेवली.
यानंतर याकोबाने आपली वस्त्रे फाडली आणि गोणपाट नेसून त्याने मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
त्याचे सर्व पुत्र आणि कन्या आले आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो म्हणत असे, “मी पुत्र शोकानेच मरेन आणि अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” अशा रीतीने तो त्याच्यासाठी दुःखाने रडत असे.
इजिप्त देशामध्ये धान्य मिळते, हे जेव्हा याकोबाच्या कानी गेले, तेव्हा तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “एकमेकांच्या तोंडाकडे नुसते पाहत का उभे राहिलात?”
मग त्याने पुढे म्हटले, “इजिप्तमध्ये धान्य मिळत आहे, असे मी ऐकले आहे. तुम्ही तिथे जा आणि आपल्यासाठी थोडे धान्य विकत घेऊन या, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”
परंतु देशात दुष्काळ तीव्र होता.
इजिप्तमधून त्यांनी आणलेले धान्य संपले तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये पुनः जाऊन आपल्यासाठी थोडे धान्य विकत आणा.”
तेव्हा यहूदाह त्यास म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हाला चेतावणी दिली होती की, ‘तुमच्या भावास सोबत आणल्याशिवाय तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’
जर तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तरच आम्ही जाऊन धान्य विकत घेऊ.
जर तुम्ही त्याला पाठवित नसाल तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला म्हटले, ‘जर तुम्ही तुमच्या भावास सोबत आणले नाही तर तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ ”
इस्राएल म्हणाला, “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे तुम्ही त्याला सांगून माझ्यावर हे अनर्थ का आणले?”
यावर ते म्हणाले, “पण त्या मनुष्याने आपल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाची खोल चौकशी केली. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचे वडील अजून जिवंत आहेत काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय?’ आम्ही सहजपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘तुमच्या भावाला घेऊन या’ असे तो म्हणेल, असे आम्हाला कसे ठाऊक असणार?”
तेव्हा यहूदाह आपला पिता इस्राएलला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, आम्ही लगेच जाऊ, म्हणजे तुम्ही, आम्ही व आमची मुले जगणार आणि मरणार नाही.
त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील.
जर आम्ही उशीर केला नसता तर इतक्या दिवसात आम्ही तिकडे दोनदा जाऊन आलो असतो.”
नंतर त्यांचे वडील इस्राएल त्यांना म्हणाले, “जर असेच असेल तर मग हे करा: या देशात उत्पादन होणारे सर्वोत्तम पदार्थ—थोडे औषधी बलसान, थोडे मध, मसाले, गंधरस, पिस्ते व बदाम आपल्या गोण्यात घ्या आणि या वस्तू त्या मनुष्याला देणगी म्हणून घेऊन जा.
दुप्पट चांदी सोबत घेऊन जा म्हणजे तुमच्या पोत्याच्या तोंडाशी असलेला चांदीचा पैसाही तुम्हाला परत करता येईल. कदाचित काही तरी चूक झाली असेल.
तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा.
त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.”
ते त्यांना म्हणाले, “योसेफ अजून जिवंत आहे! तो इजिप्त देशाचा अधिपती झाला आहे.” हे ऐकून याकोब अवाक झाला; त्याचा त्याच्या पुत्रांच्या बातमीवर विश्वास बसेना.
परंतु जेव्हा त्यांनी त्याला योसेफाचा निरोप सांगितला आणि योसेफाने पाठविलेल्या धान्याच्या गाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा त्यांचा पिता याकोब याच्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त झाले.
आणि इस्राएलने म्हटले, “माझी खात्री झाली आहे! माझा पुत्र योसेफ जिवंत आहे, आता मृत्यूपूर्वी मी स्वतः त्याला जाऊन भेटेन.”