मुख्य मजकुरावर जा

Jacob बद्दल बायबलमधील वचने: Esau seeks to slay, escapes to Padan-Aram

11 वचने · 49 पैलू

Esau seeks to slay, escapes to Padan-Aram बद्दल वचने

  1. एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.”

  2. परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे.

  3. तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा.

  4. तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा.

  5. तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?”

  6. नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”

  7. तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस.

  8. तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर.

  9. सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो.

  10. अब्राहामाला जे आशीर्वाद परमेश्वराने दिले, ते तुझ्या वंशजाला लाभोत, ज्या भूमीवर तू आता परदेशी म्हणून राहत आहेस, ती भूमी तुझ्या मालकीची होवो, कारण परमेश्वराने ती अब्राहामाला दिलेली आहे.”

  11. अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले.