मुख्य मजकुरावर जा

Jacob बद्दल बायबलमधील वचने: God confirms the covenant of Abraham to

23 वचने · 49 पैलू

God confirms the covenant of Abraham to बद्दल वचने

  1. शिडीच्या वरच्या टोकाला याहवेह उभे राहून त्यास म्हणाले, “मी याहवेह, तुझा पिता अब्राहाम व इसहाक यांचा परमेश्वर आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.

  2. तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.

  3. पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.”

  4. मग याकोब झोपेतून जागा झाला, त्याने विचार केला, “निश्चितच याहवेहची उपस्थिती या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हते.

  5. तो भयभीत झाला आणि म्हणाला, हे किती अद्भुत स्थळ आहे! हे परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही; हे स्वर्गाचे द्वार आहे.”

  6. दुसर्‍या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले.

  7. त्याने त्या जागेचे नाव बेथेल असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते.

  8. नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,

  9. व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील

  10. आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”

  11. याकोब पद्दन-अराम वरून बेथेल येथे आला तेव्हा परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.

  12. परमेश्वर त्याला म्हणाले, “तुझे नाव याकोब आहे, पण आता येथून पुढे, तुला याकोब म्हणजे ‘ठक’ असे म्हणणार नाहीत, तर इस्राएल असे म्हणतील.” याप्रकारे त्याला इस्राएल हे नाव देण्यात आले.

  13. परमेश्वर त्याला म्हणाले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे; फलद्रूप हो आणि तुझी संख्या अनेक पटीने वाढो. तुझे एक मोठे राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून मी तुझी वृद्धी करेन. पुष्कळ राजे तुझ्या वंशजातून उदय पावतील.

  14. अब्राहाम व इसहाक यांना जो देश मी दिला तो मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना देईन.”

  15. ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणाहून परमेश्वर वर निघून गेले.

  16. नंतर याकोबाने ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणी एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर परमेश्वराला पेयार्पण ओतले आणि त्या स्तंभावर तैलाभ्यंग केला.

  17. ज्या स्थानी परमेश्वर त्याच्याशी बोलले होते. त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल असे ठेवले.

  18. अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही या सर्वांचे स्मरण करा.

  19. कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.

  20. ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती,

  21. हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली,

  22. आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला:

  23. “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.”