मुख्य मजकुरावर जा

Jacob बद्दल बायबलमधील वचने: Sharp practice of, with the flocks and herds of Laban

12 वचने · 49 पैलू

Sharp practice of, with the flocks and herds of Laban बद्दल वचने

  1. आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल.

  2. आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”

  3. लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.”

  4. त्याच दिवशी लाबान आपल्या कळपात गेला आणि त्याने पट्टेदार आणि ठिपके असलेली बोकडे व डाग आणि ठिपके असलेल्या शेळ्या (ज्यांच्यावर पांढरा डाग होता) आणि गडद रंगांची मेंढरे वेगळी करून आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केली.

  5. नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला.

  6. मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या.

  7. त्या काठ्या त्याने कळपाच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात ठेवल्या, जेणेकरून जेव्हा ते पाणी पिण्याकरिता येतील तेव्हा ते थेट कळपांसमोर असतील.

  8. त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत.

  9. मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही.

  10. जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी.

  11. पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत.

  12. याचा परिणाम असा झाला की, याकोब खूप श्रीमंत झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट आणि गाढवे त्याच्या मालकीची झाली.