मुख्य मजकुरावर जा

Jacob बद्दल बायबलमधील वचने

285 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याप्रमाणे याकोबाच्या पुत्राच्या स्त्रियांच्या व्यतिरिक्त इजिप्तमध्ये गेलेल्या त्याच्या संतानात एकूण सहासष्ट व्यक्ती होत्या.

  2. योसेफाला इजिप्तमध्ये झालेल्या दोन पुत्रांचा यामध्ये समावेश केला तर इजिप्तमध्ये आलेल्या याकोबाच्या कुटुंबाचे एकूण सत्तरजण होते.

  3. याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले,

  4. योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले.

  5. मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मला खुशाल मरण येवो, कारण तू जिवंत आहेस हे मी स्वतः पाहिले आहे.”

  6. योसेफ आपल्या भावांना आणि पित्याच्या कुटुंबातील सर्वांना म्हणाला, “मी वर जाऊन फारोहला सांगेन की, ‘माझे भाऊ व माझ्या पित्याचे संपूर्ण कुटुंब कनान देशातून मजकडे आले आहेत.

  7. मी त्याला सांगेन, हे मेंढपाळ आहेत; त्यांनी त्यांच्याबरोबर आपली शेरडेमेंढरे, गुरे व त्यांचे सर्वस्व आणले आहे.’

  8. म्हणून फारोह जेव्हा तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुमचा व्यवसाय काय आहे?’

  9. तेव्हा तुम्ही असे उत्तर द्यावे, ‘आमच्या वडीलांप्रमाणे तुझ्या सेवकांनी लहानपणापासून गुरे पाळली आहेत.’ म्हणजे तो तुम्हाला येथेच गोशेन प्रांतात राहू देईल, कारण इजिप्तमध्ये मेंढपाळांना तुच्छ मानले जाते.”

  10. योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.”

  11. त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना निवडले आणि फारोहपुढे उपस्थित केले.

  12. फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?” त्यांनी फारोहला उत्तर दिले, “तुमचे सेवक आमच्या पूर्वजांप्रमाणेच मेंढपाळ आहोत.”

  13. ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”

  14. फारोह योसेफाला म्हणाला, “तुझे वडील व भाऊ तुझ्याकडे आले आहेत,

  15. आणि संपूर्ण इजिप्त देश तुझ्यासमोर आहे; या देशातील उत्तम भागात तुझ्या पित्याला आणि भावांना राहण्यास दे. त्यांना गोशेन येथे राहू दे. आणि त्यांच्यापैकी कोणी विशेष क्षमता असणारे असतील तर त्यांच्यावर माझ्याही गुरांची जबाबदारी सोपवून दे.”

  16. मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला.

  17. फारोहने त्याला विचारले, “तुमचे किती वय आहे?”

  18. आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.”

  19. नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला.

  20. याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली.

  21. योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले.

  22. इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस,

  23. परंतु जेव्हा मी माझ्या पूर्वजांसोबत झोपी जाईन, मला इजिप्तमधून बाहेर ने आणि त्यांना जिथे पुरले आहे, तिथे मला मूठमाती दे.” त्याने म्हटले, “तुम्ही जसे सांगितले आहे तसेच मी करेन.”

  24. “मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली.

  25. नंतर त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या परमेश्वरापुढे माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक विश्वासाने चालले, तेच परमेश्वर आजपर्यंत माझ्या जीवनाचे मेंढपाळ राहिले आहे,