Skip to content

Jacob बद्दल बायबलमधील वचने

285 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, ते या मुलांना आशीर्वादित करोत. माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, त्यांना पुष्कळ मुलेबाळे व गोत्र लाभोत.”

  2. त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला.

  3. योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.”

  4. परंतु त्याच्या वडिलांनी ते नाकारले आणि ते म्हणाले, “मला माहीत आहे, माझ्या मुला, मला माहीत आहे. त्याचीही कुळे होतील आणि तो देखील महान होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्याच्याहीपेक्षा थोर होईल आणि त्याचे लोक राष्ट्रांचे समुदाय बनतील.”

  5. त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले.

  6. नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील.

  7. आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.”

  8. नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या.

  9. कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.

  10. शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली.

  11. “माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.”

  12. फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.”

  13. मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित—

  14. तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली.

  15. अशाप्रकारे योसेफाबरोबर रथ, घोडेस्वार गेले. तो मोठा समुदाय होता.

  16. जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला.

  17. जेव्हा तिथे राहणाऱ्या कनानी लोकांनी अटादच्या खळ्यावर शोक करताना पाहिले, यार्देनजवळच्या त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव ठेवले. कारण ते म्हणाले, “इजिप्तच्या लोकांची ही मोठा शोक करण्याची जागा आहे.”

  18. इस्राएलने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी सर्वकाही केले:

  19. त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली.

  20. याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत:

  21. रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह;

  22. इस्साखार, जबुलून आणि बिन्यामीन;

  23. दान आणि नफताली; गाद व आशेर.

  24. याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता.

  25. अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही या सर्वांचे स्मरण करा.