Skip to content

Jacob बद्दल बायबलमधील वचने

285 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिने त्याचे नाव इस्साखार असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.”

  2. नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला.

  3. तिने त्याचे नाव जबुलून असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “परमेश्वराने माझ्या पतीसाठी मला चांगल्या देणग्या दिल्या आहेत. कारण मी त्याच्या सहा पुत्रांना जन्म दिला आहे, आता ते मला माझा आदर करतील.”

  4. काही वेळेनंतर तिने एका कन्येला जन्म दिला आणि तिचे नाव दीना असे ठेवले.

  5. तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले.

  6. ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.”

  7. तिने त्याचे नाव योसेफ असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.”

  8. आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल.

  9. आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”

  10. लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.”

  11. त्याच दिवशी लाबान आपल्या कळपात गेला आणि त्याने पट्टेदार आणि ठिपके असलेली बोकडे व डाग आणि ठिपके असलेल्या शेळ्या (ज्यांच्यावर पांढरा डाग होता) आणि गडद रंगांची मेंढरे वेगळी करून आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केली.

  12. नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला.

  13. मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या.

  14. त्या काठ्या त्याने कळपाच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात ठेवल्या, जेणेकरून जेव्हा ते पाणी पिण्याकरिता येतील तेव्हा ते थेट कळपांसमोर असतील.

  15. त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत.

  16. मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही.

  17. जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी.

  18. पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत.

  19. याचा परिणाम असा झाला की, याकोब खूप श्रीमंत झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट आणि गाढवे त्याच्या मालकीची झाली.

  20. याकोब आपल्या वाटेने जात असता परमेश्वराचा दूत त्यास भेटले.

  21. जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले.

  22. यानंतर याकोब पद्दन-अरामचा प्रवास पूर्ण करून कनान देशातील शेखेम नावाच्या शहरात सुखरुपपणे पोहोचला आणि शहराच्या बाहेर त्याने आपला तळ दिला.

  23. जिथे त्याने तळ दिला होता तेथील जमिनीचा काही भाग त्याने शेखेमचा पिता हमोर याच्याकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतला.

  24. मग तिथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव त्याने एल एलोहे इस्राएल असे ठेवले.

  25. मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.”