Skip to content

Jacob बद्दल बायबलमधील वचने

285 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या रात्री सूर्य मावळल्यावर तो मुक्कामास एके ठिकाणी थांबला असताना, त्याने एक धोंडा उशासाठी घेतला आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला.

  2. तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याने पृथ्वीवर उभी केलेली व तिचे वरचे टोक स्वर्गाला टेकलेले आहे अशी एक शिडी पाहिली. परमेश्वराचे दूत त्या शिडीवरून वर जाताना व खाली उतरतांना त्याने पाहिले.

  3. शिडीच्या वरच्या टोकाला याहवेह उभे राहून त्यास म्हणाले, “मी याहवेह, तुझा पिता अब्राहाम व इसहाक यांचा परमेश्वर आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.

  4. तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.

  5. पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.”

  6. मग याकोब झोपेतून जागा झाला, त्याने विचार केला, “निश्चितच याहवेहची उपस्थिती या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हते.

  7. तो भयभीत झाला आणि म्हणाला, हे किती अद्भुत स्थळ आहे! हे परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही; हे स्वर्गाचे द्वार आहे.”

  8. दुसर्‍या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले.

  9. त्याने त्या जागेचे नाव बेथेल असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते.

  10. नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,

  11. व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील

  12. आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”

  13. लाबान त्याला म्हणाला, “आपण एकमेकांचे नातेवाईक असलो तरी त्यामुळे तू माझ्यासाठी फुकट काम करावे हे योग्य नाही. तू वेतन म्हणून काय घेशील?”

  14. लाबानाला दोन कन्या होत्या. वडील कन्येचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल.

  15. लेआचे डोळे निस्तेज होते पण राहेल बांधेसूद व दिसायला सुंदर होती.

  16. याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.”

  17. लाबान म्हणाला, “परकीय मनुष्याला तिला देण्यापेक्षा ती तुला देणेच उत्तम आहे. माझ्यासोबत इथे राहा.”

  18. याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली.

  19. तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.”

  20. तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.

  21. परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली.

  22. आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली.

  23. पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?”

  24. लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही.

  25. लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.”