Skip to content

Jacob बद्दल बायबलमधील वचने

285 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली.

  2. आपल्या वडिलाजवळ जाऊन याकोब म्हणाला, “बाबा.” तो म्हणाला, “काय माझ्या बाळा? तू कोण आहेस?”

  3. तेव्हा याकोबाने उत्तर दिले, “मी एसाव, तुमचा ज्येष्ठपुत्र आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. कृपया उठून बसा आणि तुमच्यासाठी शिकार करून आणलेले भोजन खा, म्हणजे तुम्ही मला तुमचे आशीर्वाद द्या.”

  4. त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.”

  5. मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.”

  6. तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.”

  7. त्याने त्याला ओळखले नाही, कारण त्याचे हात एसावाच्या हातांसारखे केसाळ होते. तो याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी तयार झाला,

  8. त्याने विचारले, “तू खरोखर माझा पुत्र एसावच आहेस काय?” तो म्हणाला “होय, मीच आहे.”

  9. मग इसहाक त्यास म्हणाला, “त्या शिकारीचे भोजन इकडे आण. मी ते खाईन आणि माझे आशीर्वाद तुला देईन.” तेव्हा याकोबाने जेवणाचे ताट आणले, तो जेवला आणि मग द्राक्षारस त्याच्याकडे आणले, तेही तो प्याला.

  10. मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.”

  11. तो आपल्या पित्याजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. जेव्हा इसहाकाला त्याच्या वस्त्रांचा वास आला, तेव्हा त्याला आशीर्वाद देत तो म्हणाला, “अहा, माझ्या पुत्राचा सुगंध, जसा याहवेहने आशीर्वादित केलेल्या शेताचा.

  12. परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.

  13. राष्ट्रे तुझी सेवा करोत, आणि लोक तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”

  14. एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.”

  15. परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे.

  16. तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा.

  17. तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा.

  18. तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?”

  19. नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”

  20. तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस.

  21. तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर.

  22. सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो.

  23. अब्राहामाला जे आशीर्वाद परमेश्वराने दिले, ते तुझ्या वंशजाला लाभोत, ज्या भूमीवर तू आता परदेशी म्हणून राहत आहेस, ती भूमी तुझ्या मालकीची होवो, कारण परमेश्वराने ती अब्राहामाला दिलेली आहे.”

  24. अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले.

  25. याकोब बेअर-शेबा सोडून हारानास जाण्यास निघाला.