मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह गरजूंचे ऐकतात आणि ते आपल्या बंदिवानांचा अव्हेर करीत नाही.

  2. असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या तुम्ही मला दाखविल्या आहेत, तरी तुम्ही मला नवजीवन द्याल, आणि पृथ्वीच्या गर्भातून तुम्ही मला पुन्हा वर काढाल.

  3. माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.

  4. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला; त्यांच्या धष्टपुष्टांस ठार करून, इस्राएलच्या तरुणांना खाली पाडले.

  5. इतके सर्व झाले तरी ते लोक पाप करीतच राहिले; त्यांच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

  6. म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले आणि घोर भीतीने त्यांची वर्षे व्यापून टाकली.

  7. जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले; ते मनापासून पुन्हा त्यांच्याकडे वळले.

  8. तुम्ही मला अत्यंत खोल दरीत ढकलून दिले आहे, काळ्याकुट्ट डोहात टाकले आहे.

  9. तुमच्या क्रोधाचा भार मला फारच जड झाला आहे; तुमच्या क्रोधाच्या लाटांनी मला पीडले आहे. सेला

  10. तुमच्या क्रोधाने मला ग्रासले आहे. तुमच्या भीतीने माझा विध्वंस झाला आहे.

  11. मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात.

  12. तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे; आणि त्याचा राजमुकुट धुळीत फेकून तो भ्रष्ट केला आहे.

  13. त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत; त्याचा प्रत्येक किल्ला तुम्ही जमीनदोस्त केला आहे.

  14. येणारा जाणारा प्रत्येकजण त्याला लुबाडतो; आणि तो त्याच्या शेजार्‍यांकरिता घृणापात्र झाला आहे.

  15. तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे.

  16. तुम्ही त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे आणि लढाईत त्याला मदत करण्याचे नाकारले आहे.

  17. तुम्ही त्याचे वैभव नष्ट केले आहे आणि त्याचे सिंहासन धुळीत टाकले आहे.

  18. त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत; आणि त्याला लज्जेच्या वस्त्राने पांघरले आहे. सेला

  19. तुमच्या क्रोधाने आम्ही भस्म होतो; तुमच्या संतापाने आम्ही दडपून जातो.

  20. तुम्ही जितके दिवस हालअपेष्टा भोगावयास लावले, तितके दिवस हर्षभरित करा, त्या वर्षांच्या प्रमाणात आता आम्हाला आनंद द्या.

  21. याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता, ज्याला तुम्ही तुमचे विधिनियम देण्यासाठी निवडले आहे;

  22. जोपर्यंत दुष्टासाठी खाच खोदली जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला विपत्तीपासून विसावा देता.

  23. याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.

  24. “हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला, तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले.

  25. जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले, तेव्हा तुमच्या सांत्वनाने मला हर्षित केले.