मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात, त्यातील एकही मोडणार नाही.

  2. ज्याला याहवेह प्रिय वाटतात, त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात;

  3. जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.

  4. दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात, त्यांना जिवे मारण्याची वाट पाहत असतात.

  5. परंतु याहवेह त्यांना दुष्ट लोकांच्या हाती देणार नाही, किंवा न्यायालयात त्यांना ते दोषीही ठरविले जाऊ देणार नाही.

  6. तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे; माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही.

  7. ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात.

  8. हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.

  9. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत. परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.

  10. आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”

  11. तू आपला भार याहवेहवर टाक आणि ते तुला आधार देतील; नीतिमानाला ते कधीही विचलित होऊ देणार नाही.

  12. तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत; तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत; तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय?

  13. ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत.

  14. परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन, याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन—

  15. संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.

  16. फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.

  17. तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे.

  18. खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.

  19. माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.

  20. माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला

  21. परमेश्वर एकदा बोलले आहेत, मी दोनदा हे ऐकले आहे: “सामर्थ्य याहवेहचेच आहे,

  22. आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;” आणि, “तुम्ही प्रत्येकाला त्याच्या कृत्यानुसार प्रतिफळ देता.”

  23. तुम्ही आम्हाला कारागृहात आणले आणि आमच्या पाठीवर भारी ओझी लादली.

  24. एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात, कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात; परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.

  25. त्यांच्याकडून होणार्‍या तिरस्काराने माझे हृदय भग्न झाले आहे; मी अत्यंत हतबल झालो आहे; मी सहानुभूतीची अपेक्षा केली, पण ती मला मिळाली नाही; मी सांत्वना देणार्‍यांचा शोध घेतला पण मला कोणीही आढळले नाही.