मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने: Dispensation of God

166 वचने · 5 पैलू

Dispensation of God बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?

  2. पाहा, मी तुम्हाला याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दिलेले विधी व नियम यासाठी शिकविले की जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळी ते तुम्ही पाळावे.

  3. तुम्ही जर ते पाळले तर तुम्ही सुज्ञ व समंजस आहात अशी तुमची किर्ती होईल. जेव्हा सभोवतालची राष्ट्रे या नियमांविषयी ऐकतील तेव्हा ती म्हणतील, “इस्राएली राष्ट्रातील लोक निश्चितच बुद्धिमान व समंजस आहेत.”

  4. याहवेह आपले परमेश्वर जसे आपण त्यांना प्रार्थना करतो तेव्हा ते आपल्या समीप असतात त्याप्रमाणे दुसरे कोणते महान राष्ट्र आहे ज्याचे देव त्यांच्या समीप असतात?

  5. आणि एवढे महान राष्ट्र कोणते आहे, ज्याचे विधी आणि नियम या नियमशास्त्रासारखे न्याय्य आहेत, जे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे?

  6. तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा.

  7. ज्या दिवशी तुम्ही होरेब पर्वताजवळ याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर उभे होता, त्या दिवसाविषयी त्यांना सांगा. त्या दिवशी याहवेहनी मला म्हणाले होते, “माझ्यासमोर सर्व लोकांना माझे शब्द ऐकण्यासाठी एकत्र कर, म्हणजे ते पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत माझा आदर करतील आणि आपल्या मुलाबाळांना माझे शब्द शिकवतील.”

  8. मग तुम्ही जवळ येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन उभे राहिलात आणि पर्वत अग्नीने पेटला होता, त्याची ज्वाला आकाशापर्यंत पोहोचली होती, सर्वत्र अंधार, ढग आणि घनदाट अंधकार पसरला होता.

  9. मग याहवेह तुमच्याशी अग्नीतून बोलले, तुम्ही त्यांचे शब्द ऐकले, परंतु त्यांची आकृती तुम्हाला दिसली नाही; फक्त वाणी ऐकली.

  10. त्यांनी आपला करार तुम्हाला घोषित केला, दहा आज्ञा, ज्या पालन करण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.

  11. आणि त्यावेळी याहवेहने मला आज्ञा केली की तुम्ही यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेणार आहात तिथे तुम्हाला जे विधी व नियम पाळायचे आहेत ते शिकवावे.

  12. याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही;

  13. म्हणून कोणत्याही पुरुष अथवा स्त्रीच्या आकाराची कोरीव मूर्ती करून तुम्ही स्वतःला भ्रष्ट करू नये,

  14. किंवा पृथ्वीवरील एखाद्या पशूची किंवा आकाशात उडणार्‍या कोणत्याही पक्ष्याची,

  15. अथवा जमिनीवर रांगणार्‍या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्‍या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये.

  16. जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत.

  17. परंतु याहवेहने तुम्हाला इजिप्तच्या तप्त लोखंडी भट्टीतून यासाठी सोडवून आणले की, तुम्ही त्यांचे खास निवडलेले लोक, त्यांचे वारसदार व्हावे, जसे तुम्ही आज आहात.

  18. पण तुमच्यामुळेच याहवेह माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला शपथपूर्वक सांगितले आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी वतनादाखल दिलेल्या त्या उत्तम देशात यार्देन ओलांडून तुला जाता येणार नाही.

  19. तुला याच देशात मरावे लागणार; मी यार्देन पार करू शकणार नाही; परंतु तुम्ही मात्र पार करून तो उत्तम प्रदेश वतन म्हणून ताब्यात घ्याल.

  20. तेव्हा सावधगिरी बाळगा, नाहीतर याहवेह तुमच्या परमेश्वराने मनाई केलेल्या वस्तूंची तुम्ही स्वतःसाठी कोरीव प्रतिमा कराल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराचे तुम्हाला विस्मरण होईल.

  21. कारण याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणारे अग्नी व ईर्ष्यावान असे परमेश्वर आहेत.

  22. तुम्हाला जेव्हा मुले आणि नातवंडे होतील आणि त्या देशात तुम्ही बराच काळ वास्तव्य केल्यावर तुम्ही मूर्तिपूजा करून स्वतःला भ्रष्ट केले, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यावर अतिशय कोपायमान होतील,

  23. तर मी सांगतो की तुमच्याविरुद्ध स्वर्ग व पृथ्वी ही दोन्हीही साक्षी असतील, मग तुम्ही यार्देन पार करून जो देश ताब्यात घ्याल, त्या देशात तुमचा लवकरच नाश होईल. तुमचे तेथील वास्तव्य अगदी अल्पकाळ असेल व तुमचा संपूर्णपणे नायनाट होईल.

  24. याहवेह, तुमची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग करतील आणि ज्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला घेऊन जातील त्यांच्यापैकी फक्त काही लोकच मागे उरतील.

  25. तिथे तुम्ही लाकूड आणि दगडाच्या मानवनिर्मित दैवतांची सेवा कराल, जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत किंवा वासही घेऊ शकत नाहीत.