मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने: Consolation in

287 वचने · 5 पैलू

"Afflictions and Adversities" साठी शोधा

Consolation in बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्‍याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली.

  2. तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.”

  3. तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, “तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा.”

  4. दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.”

  5. याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले, “आता तू गर्भवती आहेस आणि तुला एक पुत्र होईल. तू त्याचे नाव इश्माएल असे ठेव, कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे.

  6. तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल; त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल; आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.”

  7. तिच्याशी बोलणार्‍या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.”

  8. तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.

  9. त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”

  10. दुसर्‍या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.

  11. जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले,

  12. आणि ती त्याच्यापासून सुमारे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, “माझ्या बाळाचा मृत्यू मला पाहावयाला नको आहे,” असे म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली.

  13. मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे.

  14. ऊठ, त्याला उचलून घे, कारण मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन.”

  15. मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले.

  16. परमेश्वर त्या मुलासोबत होते. तो पारानच्या रानात लहानाचा मोठा होऊन एक तरबेज तिरंदाज झाला;

  17. पुढे तो पारानच्या रानात राहत असताना त्याच्या आईने त्याचा इजिप्त देशातील एका मुलीसह विवाह करून दिला.

  18. तेव्हा इसहाकाने ते ठिकाण सोडले आणि गरारच्या खोर्‍यात तळ देऊन राहू लागला.

  19. इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.

  20. इसहाकाच्या नोकरांनी खोर्‍यात एक नवी विहीर खणली आणि तिथे त्यांना गोड पाण्याचा एक झरा सापडला.

  21. मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले.

  22. मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह असे ठेवले.

  23. यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.”

  24. पुढे इसहाक तिथून बेअर-शेबाला गेला;

  25. त्याच रात्री याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा पिता अब्राहामाचा परमेश्वर आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन आणि तुझा वंश वाढवेन.”