मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने: Benefits of

63 वचने · 5 पैलू

Benefits of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.

  2. कारण याहवेह तुमचे परमेश्वर हे कनवाळू आहेत. ते तुम्हाला सोडणार वा टाकणार नाहीत किंवा त्यांनी तुमच्या पूर्वजांशी केलेला शपथपूर्वक करार ते विसरणार नाहीत.

  3. मी तुमच्यापुढे ठेवलेले हे सर्व आशीर्वाद आणि शाप तुम्हावर येतील, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला घालवून दिलेल्या देशात राहत असताना तुम्ही या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवाव्या,

  4. आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल,

  5. “आपल्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा आपले इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातात आणि जेव्हा ते आपल्याकडे पुन्हा वळतात व आपल्या नावाची थोरवी गाऊन, या मंदिरात आपल्याकडे प्रार्थना व विनंती करतात,

  6. “आपल्या लोकांनी आपल्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील आणि आपल्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील,

  7. आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’;

  8. आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील,

  9. तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा.

  10. आणि ज्या आपल्या लोकांनी आपणाविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करावी. त्यांनी आपणाविरुद्ध केलेल्या सर्व अपराधांची त्यांना क्षमा करा व त्यांना कैद करून नेणार्‍यांनी त्यांच्यावर दया दाखवावी असे आपण करावे;

  11. कारण ते तुमचे लोक आणि तुमचे वतन आहेत, ज्यांना तुम्ही इजिप्त देशातून, त्या लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढले आहे.

  12. “तुमचे कान आपल्या सेवकाच्या व आपल्या इस्राएली लोकांच्या विनंतीकडे असावे आणि जेव्हा ते आपल्याकडे आरोळी करतील तेव्हा त्यांचे ऐकावे.

  13. कारण हे सार्वभौम याहवेह, आपण जेव्हा आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर काढले त्यावेळी तुमचा सेवक मोशेद्वारे तुम्ही जसे जाहीर केले, त्यानुसार त्यांना आपले वतन व्हावे म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतून तुम्ही त्यांना वेगळे केले आहे.”

  14. “जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला,

  15. आणि तुमच्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश आणि वेदना जाणून प्रार्थना किंवा विनंती करतील आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील;

  16. तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार घडवून आणा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण तुम्हाला त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ तुम्हीच मानवाचे हृदय जाणणारे आहात),

  17. यासाठी की जो देश तुम्ही आमच्या पूर्वजांना दिला त्यात जितका काळ ते राहतील, त्यांनी तुमचे भय बाळगावे व तुमच्या आज्ञेत राहावे.

  18. कारण कष्ट मातीतून वाढत नाही, आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.

  19. खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे.

  20. “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.

  21. आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.

  22. ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; आणि शेतांवर पाणी पाडतात.

  23. नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.

  24. “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.

  25. परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत; जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्‍यासारखा मी प्रमाणित होईन.