मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे.

  2. “माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा, कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे.

  3. “तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?

  4. परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत; जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्‍यासारखा मी प्रमाणित होईन.

  5. परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे; सर्वसमर्थाने मला भीतीने जखडले आहे.

  6. “ज्या परमेश्वराने मला न्याय देण्याचे नाकारले आहे, आणि ज्या सर्वसमर्थाने माझे जीवन कटुत्वाने भरले आहे, त्यांना स्मरून मी सांगतो,

  7. त्यांचा पुढारी म्हणून मी त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन केले; त्यांच्या सैन्याचा राजा म्हणून मी त्यांच्यात वास केला; शोक करणार्‍यांचे सांत्वन करणारा असा मी होतो.

  8. आता तर परमेश्वरानेच माझ्या कमानीची तार सैल सोडून मला पीडले आहे, माझ्यासमोर ते अनियंत्रितपणे वागतात.

  9. मी जर कोणाला वस्‍त्राविना, आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले,

  10. त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले तरीही त्यांच्या हृदयाने मला आशीर्वाद दिला नाही,

  11. न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून, मी जर एखाद्या अनाथावर हात उगारला असेन,

  12. तर खांद्यापासून माझा हात गळून पडो, सांध्‍यापासून ते तुटून जावोत.

  13. परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल? जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल? तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,

  14. तरी देखील कोणीही म्हणत नाही, ‘परमेश्वर माझा निर्माणकर्ता कुठे आहे, जे रात्रीच्या वेळी गीत देतात, ते कुठे आहेत,

  15. याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.

  16. ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.

  17. संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र. माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?

  18. माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

  19. मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.

  20. कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील.

  21. माझ्या सभोवती असणार्‍या शत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील. मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन; मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.

  22. त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.

  23. तुमच्या प्रीतीमुळे मी आनंदाने प्रफुल्लित झालो आहे, कारण तुम्ही माझ्या पीडा पाहिल्या आहेत आणि माझ्या आत्म्यातील संघर्ष तुम्हाला समजले आहेत.

  24. कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.

  25. नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही, परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात.