मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील; युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील.

  2. जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील, विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही.

  3. विनाश व दुष्काळ यांना तू हसशील, आणि हिंस्त्र पशूंचे भय तुला वाटणार नाही.

  4. कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल, आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील.

  5. तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील; तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही.

  6. तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल, आणि तुझे वंशज पृथ्वीवरील गवतासारखे होतील.

  7. जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात, तसेच तू कबरेत जाईपर्यंत तुझ्या शौर्याचा ऱ्हास होणार नाही.

  8. “हे सर्व अगदी सत्य आहे आणि याची आम्ही परीक्षा केली आहे. म्हणून माझा हा सल्ला ऐकून त्याचा अंगीकार करून घे.”

  9. सर्वसमर्थाचे बाण माझ्यात शिरले आहेत, त्या बाणांचे विष माझा आत्मा पिऊन टाकतो; परमेश्वराचा आतंक माझ्याविरुद्ध उभा आहे.

  10. जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार?

  11. मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही.

  12. वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.

  13. ते मला श्वास घेऊ देत नाहीत, परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात.

  14. जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल?

  15. मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.

  16. “मी जरी निर्दोष असलो, मला स्वतःबद्दल चिंता नाही; मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो.

  17. हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो, ‘निर्दोषी आणि दोषी या दोघांचाही ते नाश करतात.’

  18. जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात.

  19. जेव्हा पृथ्वी दुष्टाच्या हाती जाते, ते न्यायाधीशांचे डोळे झाकतात. जर ते नाहीत, तर मग कोण?

  20. “माझे दिवस एखाद्या धावपट्टू पेक्षाही वेगवान आहेत; आनंदाची झलक नसतानाच ते उडून जातात.

  21. ते लव्हाळ्याच्या वेगवान तारवांसारखे, भक्ष्यावर झडप घालणार्‍या गरुडासारखे निघून जात आहेत.

  22. मी जर म्हणालो की, ‘मी माझे गार्‍हाणे विसरेन, माझे भाव बदलून उल्हास करेन,’

  23. तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील; कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही.

  24. मी आधी दोषी ठरविला गेलो आहे, तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे?

  25. जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,