मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.

  2. आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील.

  3. मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.

  4. “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,

  5. तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’

  6. “परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,

  7. तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन.

  8. हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’

  9. तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर ज्यांनी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून त्यांनी त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”

  10. आणि म्हणाला: “आईच्या उदरातून मी नग्न आलो, आणि नग्नच मी परत जाईन, याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”

  11. परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास; तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास.

  12. कारण कष्ट मातीतून वाढत नाही, आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.

  13. खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे.

  14. “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.

  15. आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.

  16. ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; आणि शेतांवर पाणी पाडतात.

  17. नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.

  18. धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये, म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात,

  19. ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात, आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात.

  20. दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो; आणि रात्र असल्याप्रमाणे भर दुपारच्या प्रहरी ते चाचपडतात.

  21. परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून; व बलवानांच्या तावडीतून वाचवितात.

  22. म्हणून दीन लोकांस आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करेल.

  23. “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.

  24. कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्‍दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.

  25. सहा संकटातून ते तुला वाचवतील; आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.