मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.

  2. “कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे, किंवा न्यायालयात आम्ही समोरासमोर येऊन वाद घालू.

  3. परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता, कोणी आम्हाला एकत्र आणणारा असता,

  4. कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा, म्हणजे त्यांचा धाक मला अजून भयभीत करणार नाही.

  5. मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन, पण या घटकेला, मी ते करू शकत नाही.

  6. “तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?

  7. “जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले व न्यायसभा बोलावली, तर त्यांना कोण प्रतिबंध करू शकेल?

  8. तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील.

  9. तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, आणि अंधकार पहाटेसारखा होईल.

  10. आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील.

  11. तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही, आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील.

  12. सुखी मनुष्याला विपत्तीचा तिरस्कार वाटतो; मात्र ज्यांचे पाय घसरतात त्यांच्यावर ती वार करते.

  13. ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही; ते ज्याला बंदिवासात पकडतात, त्याला सुटका नाही.

  14. परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो; आणि त्याला मोकळे सोडले, तर पृथ्वी उद्ध्वस्त होते.

  15. पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत; फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत.

  16. ते मंत्र्यांना विवस्त्र करतात आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात.

  17. राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात आणि त्यांच्या कंबरेस लंगोट बांधतात.

  18. ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात स्थिर झालेल्या अधिकार्‍यांना ते उलथून टाकतात.

  19. विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात.

  20. ते सरदारांवर तिरस्कार ओततात, आणि सबळांना दुर्बल करतात.

  21. ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात आणि घोर अंधकाराला प्रकाशाने उजळून टाकतात.

  22. ते राष्ट्रांना महान करतात आणि त्याचा नाशही करतात; ते राष्ट्रे विस्तृत करतात आणि त्यांचा नायनाट करतात.

  23. ते पृथ्वीवरील अधिकार्‍यांची बुद्धी काढून घेतात; आणि त्यांना दिशाहीन असे भटकण्यास लावतात.

  24. ते अंधारात प्रकाशाविना चाचपडतात; त्यांना मद्यपीसारखे लटपटण्यास लावतात.

  25. परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल; तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझ्या ओठांनी मी तुमचे सांत्वन करेन.