मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही माझ्यावर क्रोधाविष्ट झाला आहात; कारण संतापाने तुम्ही मला उचलून फेकून दिले.

  2. माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले; त्यांनी माझे आयुष्य कमी केले.

  3. जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्‍यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.

  4. कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात, आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे.

  5. सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.

  6. माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.

  7. याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो, व त्यापासून माझे सांत्वन होते.

  8. मी कुठेही राहिलो तरी, तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत.

  9. जर तुमचे नियम माझ्या सुखाचा ठेवा झाले नसते, तर पीडेने माझा केव्हाच अंत झाला असता.

  10. संकट आणि क्लेशाने मला घेरले आहे, परंतु तुमच्या आज्ञा मला सुखावतात.

  11. जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले; मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.

  12. मी संकटांनी वेढलेला असलो, तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता; माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता; तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.

  13. याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

  14. मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात, आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात.

  15. याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात.

  16. भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात, आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.

  17. माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस; आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस;

  18. कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो, याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!

  19. दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो.

  20. जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो; जो दुसर्‍यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.

  21. जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे!

  22. मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.

  23. मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी; मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.

  24. विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.

  25. दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.