मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. वेशींनो, आक्रोश करा! नगरांनो विलाप करा! पलिष्टी लोकांनो, भयाने वितळून जा! कारण उत्तरेकडून धुराचा लोट येत आहे, त्यांच्या पलटणींत कोणीही रेंगाळणारे नाहीत.

  2. आता राष्ट्रांच्या राजदूतांना काय उत्तर देण्यात यावे? “याहवेहने सीयोन स्थापिले आहे, आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.”

  3. इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील.

  4. याहवेह इजिप्तवर महामारीच्या साथीने हल्ला करतील; ते त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना बरे करतील. ते याहवेहकडे वळतील आणि ते त्यांच्या विनवणीला प्रतिसाद देतील आणि त्यांना बरे करतील.

  5. तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,

  6. रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.

  7. तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल, आणि त्याचे पाप काढून टाकल्याचे हे पूर्ण फळ असेल: जेव्हा ते वेदीच्या सर्व दगडाचे चुनखडीसारखे चूर्ण करतील. अशेरा दैवतेचे स्तंभ किंवा धूपवेद्या तशाच उभ्या सोडतील.

  8. यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.

  9. जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल.

  10. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, तुमचे परमेश्वर असे म्हणतात.

  11. यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.

  12. थकलेल्यास ते शक्ती देतात आणि बलहीनाचे सामर्थ्य वाढवितात.

  13. भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.

  14. कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो तुमचा उजवा हात धरतो आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको; मी तुला साहाय्य करेन.

  15. हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,

  16. “गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण पाणी कुठेही नाही; तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे. पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.

  17. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो विश्वासूपणाने न्यायदान करेल;

  18. जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.

  19. मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.

  20. हे आकाशांनो, हर्षगर्जना करा; अगे पृथ्वी, आनंदित हो; अहो पर्वतांनो, गीते वर उचंबळून येऊ द्या! कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे व त्यांच्या पीडितांवर करुणा ते करतील.

  21. सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे, त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत, ते मला रोज सकाळी जागे करतात, शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात.

  22. मी लज्जित होणार नाही, कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.

  23. मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा!

  24. सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.

  25. तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो आणि त्यांच्या सेवकाच्या आज्ञा पाळतो? जो अंधारात चालतो, ज्याच्याकडे प्रकाश नाही, त्याने याहवेहच्या नावावर विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्या परमेश्वरावर विसंबून राहावे.