मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.

  2. “माझ्या लोकांनो, माझे ऐका; माझ्या देशा, माझ्याकडे लक्ष दे: माझाकडूनच तुम्हाला उपदेश प्राप्त होईल. माझा न्याय राष्ट्रांसाठी प्रकाश बनेल.

  3. माझी नीतिमत्ता वेगाने जवळ येत आहे, माझे तारण येण्याच्या मार्गावर आहे. माझी भुजा राष्ट्रांना न्याय प्रदान करेल. द्वीप माझा शोध घेतील आणि माझ्या भुजेची आशेने वाट पाहतील.

  4. तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा, आणि खाली पृथ्वीकडे पाहा; आकाश धुरासारखे विरून नाहीसे होईल, पृथ्वी वस्‍त्रांप्रमाणे जीर्ण होईल आणि पृथ्वीवरील लोक चिलटांप्रमाणे मरतील. परंतु माझे तारण सदासर्वकाळ टिकेल. माझ्या नीतिमत्तेचा कधीही अंत होणार नाही.

  5. “हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो, माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्‍यांनो माझे ऐका: मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका.

  6. कारण कसर त्यांचाही वस्त्रांसारखा नाश करेल; कीड लोकरीसारखे त्यांनाही खाऊन टाकेल. परंतु माझी नीतिमत्ता सदासर्वकाळ टिकेल. व माझे तारण पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.”

  7. उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, पुरातन पिढीत जसे उठले होते. नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?

  8. ते तुम्हीच नाही का, ज्यांनी समुद्र आटवून कोरडा केला, त्या अति खोल पाण्याला आटविले, ज्यांनी समुद्राच्या खोलीत मार्ग तयार केला जेणेकरून तुमचे सोडविलेले लोक ते पार करतील?

  9. ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  10. “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात,

  11. तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता, ज्यांनी आकाश ताणून पसरले आणि ज्यांनी पृथ्वीचा पाया घातला, तुम्ही सतत दहशतीखाली का जगता दिवसभर विरोधकांच्या क्रोधाच्या भीतीत का राहता? कारण त्यांनी तुमचा नाश करण्याचा निर्धार केला आहे? विरोधकांचा क्रोध कुठे आहे?

  12. “भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही. अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही. तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही.

  13. “हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो, पाचूरत्नांनी मी तुमची पुन्हा उभारणी करेन, व तुमचा पाया मौल्यवान नीलमणींवर करेन.

  14. भुकेल्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचे जीवन खर्ची घालाल, पीडितांच्या गरजांचा पुरवठा कराल, तर तुमचा प्रकाश अंधारातून झळकेल आणि तुमची रात्र मध्यान्हासारखी उजळेल.

  15. सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी याहवेहने माझा अभिषेक केला आहे. भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  16. याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  17. सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

  18. त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.

  19. याहवेहची वचने ऐकून कंपित होणार्‍या लोकांनो, याहवेहची वचने ऐका: “तुमचे भाऊबंद जे तुमचा द्वेष करतात, आणि माझ्या नामाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तुम्हाला वाळीत टाकतात, ते थट्टेने म्हणतात, ‘याहवेहचा गौरव असो, जेणेकरून, आम्ही तुमचा हर्षोल्हास बघू!’ पण ते फजीत केले जातील.

  20. जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन; आणि तुम्ही यरुशलेमाप्रीत्यर्थ सांत्वन पावाल.”

  21. हे तुमच्या नजरेस पडताच, तुम्हाला आनंदाचे भरते येईल व तुम्ही गवतासारखे बहरून जाल; याहवेहचा कल्याणकारी हात त्यांच्या सेवकांस प्रकट होईल, पण त्यांच्या शत्रूंना त्यांचा क्रोध दाखविण्यात येईल.

  22. लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’ आणि पाषाणाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे, पण त्यांचे मुख नव्हे; परंतु संकट समय येताच ते माझा धावा करून म्हणतात, ‘या आणि आमचे रक्षण करा!’

  23. आता वार्‍याच्या झोतासरशी तुझे मेंढपाळ उडून जातील, तुमच्या सर्व मित्रांना बंदिवासात नेण्यात येईल. मग तुम्ही शरमिंदे व्हाल व तुमच्या सर्व दुष्टपणामुळे तुम्ही तुमची प्रतिष्ठा घालवाल.

  24. तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात रहिवास करीत होते, जेव्हा तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा तुम्ही तळमळाल; एखादी स्त्री प्रसूती वेदनांनी व्याकूळ होऊन तळमळते तसे तुमचे होईल!

  25. त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.