मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास ३०:१८सुमारे इ.स.पू. ७२६

    एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.

  2. 2 इतिहास ३०:१९सुमारे इ.स.पू. ७२६

    जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.”

  3. 2 इतिहास ३०:२०सुमारे इ.स.पू. ७२६

    आणि याहवेहनी हिज्कीयाहचे ऐकले आणि लोकांना बरे केले.

  4. 2 इतिहास ३०:२१सुमारे इ.स.पू. ७२६

    यरुशलेममध्ये जे इस्राएली लोक उपस्थित होते, त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस मोठ्या आनंदात साजरा केला, तर लेवीय लोकांनी आणि याजकांनी याहवेहना समर्पित केलेल्या प्रतिध्वनीच्या वाद्यांसहित दररोज याहवेहची स्तुती केली.

  5. 2 इतिहास ३०:२२सुमारे इ.स.पू. ७२६

    ज्यांनी याहवेहच्या सेवेसाठी योग्य समज दाखविला, त्या सर्व लेवीय लोकांना हिज्कीयाहने प्रोत्साहित केले. सात दिवस त्यांना नेमून दिलेला त्यांचा भाग त्यांनी खाल्ला आणि शांत्यर्पणाचे अर्पण केले आणि त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती केली.

  6. 2 इतिहास ३०:२३सुमारे इ.स.पू. ७२६

    तेव्हा संपूर्ण सभेने पुढे अधिक सात दिवस हा सण साजरा करण्याचे मान्य केले; त्यामुळे आणखी सात दिवस त्यांनी हा उत्सव आनंदाने साजरा केला.

  7. 2 इतिहास ३०:२४सुमारे इ.स.पू. ७२६

    यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने या सभेसाठी एक हजार बैल आणि सात हजार मेंढ्या आणि शेळ्या दिल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यांना एक हजार बैल आणि दहा हजार मेंढ्या व शेळ्या दिल्या. तेव्हा मोठ्या संख्येने याजकांनी स्वतःला पवित्र केले.

  8. 2 इतिहास ३०:२५सुमारे इ.स.पू. ७२६

    यहूदीयाच्या संपूर्ण सभेने याजक आणि लेवीय आणि इस्राएलमधून जमलेले सर्व लोक, इस्राएलमधून आलेले परदेशी आणि यहूदीयामधील रहिवाशांनी आनंद साजरा केला.

  9. 2 इतिहास ३०:२६सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यावेळेस तिथे यरुशलेममध्ये मोठा आनंद झाला होता, कारण इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनच्या दिवसांपासून यरुशलेममध्ये यासारखे काहीही घडले नव्हते.

  10. 2 इतिहास ३०:२७सुमारे इ.स.पू. ७२६

    याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली.

  11. 2 इतिहास ३१:१सुमारे इ.स.पू. ७२६

    जेव्हा हे सर्व समाप्त झाले, तेव्हा तिथे असलेले इस्राएली लोक बाहेर पडून यहूदीयाच्या नगरांमध्ये गेले व त्यांनी पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्यांनी यहूदीया, बिन्यामीन आणि एफ्राईम व मनश्शेह येथील उच्च स्थाने आणि वेद्या नष्ट केल्या. त्यांनी ते सर्व नष्ट केल्यानंतर, इस्राएली लोक स्वतःच्या गावी आणि स्वतःच्या वतनाकडे परत आले.

  12. 2 इतिहास ३१:२सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहने याजक आणि लेवी यांची निरनिराळ्या विभागांवर—त्यांच्यातील प्रत्येकाने याजक किंवा लेवी यांनी त्यांना दिलेल्या कार्यानुसार—होमार्पण आणि शांत्यर्पण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि याहवेहच्या निवासस्थानाच्या फाटकांजवळ उपकारस्तुती आणि स्तुतिगान करण्यासाठी नेमणूक केली.

  13. 2 इतिहास ३१:३सुमारे इ.स.पू. ७२६

    राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले.

  14. 2 इतिहास ३१:४सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याने यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना याजक आणि लेवींना त्यांचा योग्य भाग देण्याची आज्ञा केली, ज्यामुळे ते स्वतःला याहवेहच्या नियमशास्त्रासाठी समर्पित करू शकतील.

  15. 2 इतिहास ३१:५सुमारे इ.स.पू. ७२६

    आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला.

  16. 2 इतिहास ३१:६सुमारे इ.स.पू. ७२६

    यहूदीयाच्या गावांमध्ये राहणाऱ्या इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांनीसुद्धा त्यांची गुरे आणि कळप यांचा दशांश आणि त्यांचा परमेश्वर याहवेहना समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशांश आणला आणि त्याचा ढीग रचला.

  17. 2 इतिहास ३१:७सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यांनी तिसऱ्या महिन्यात या कामाची सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात ते पूर्ण केले.

  18. 2 इतिहास ३१:८सुमारे इ.स.पू. ७२६

    जेव्हा हिज्कीयाह आणि त्याचे अधिकारी आले आणि त्यांनी तो ढीग पाहिला, तेव्हा त्यांनी याहवेहची स्तुती केली आणि त्यांच्या इस्राएली लोकांना आशीर्वाद दिला.

  19. 2 इतिहास ३१:९सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहने याजकांना आणि लेवीय लोकांना ढिगाबद्दल विचारले;

  20. 2 इतिहास ३१:१०सुमारे इ.स.पू. ७२६

    आणि सादोकच्या घराण्यातील अजर्‍याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.”

  21. 2 इतिहास ३१:११सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिरात भांडारगृहे तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते काम पूर्ण झाले.

  22. 2 इतिहास ३१:१२सुमारे इ.स.पू. ७२६

    नंतर त्यांनी विश्वासूपणाने वर्गणी, दशांश आणि समर्पित भेटवस्तू आणल्या. कनन्याह नावाचा लेवी या सर्व गोष्टींचा प्रभारी पर्यवेक्षक होता आणि त्याचा भाऊ शिमी त्याच्या नंतरच्या श्रेणीतील अधिकारी होता.

  23. 2 इतिहास ३१:१३सुमारे इ.स.पू. ७२६

    यहीएल, अजज्याह, नहाथ, असाहेल, यरिमोथ, योजाबाद, एलीएल, इस्माकियाह, महथ आणि बेनाइयाह हे कनन्याह आणि त्याचा भाऊ शिमीचे सहायक होते. या सर्वांना राजा हिज्कीयाहने नियुक्त केल्यामुळे त्यांनी सेवा केली आणि अजर्‍याह परमेश्वराच्या मंदिराचा नियुक्त प्रभारी अधिकारी म्हणून सेवा करीत होता.

  24. 2 इतिहास ३१:१४सुमारे इ.स.पू. ७२६

    इम्नाह लेवीचा पुत्र कोरे, पूर्वेकडील वेशीचा रखवालदार, परमेश्वराला स्वैच्छिक अर्पणावरील याहवेहना मिळालेल्या वर्गणीचे वाटप करणे आणि पवित्र भेटवस्तू यावरील अधिकारी होता.

  25. 2 इतिहास ३१:१५सुमारे इ.स.पू. ७२६

    एदेन, मिन्यामीन, येशूआ, शमायाह, अमर्‍याह आणि शखन्याहनी त्याला विश्वासयोग्यतेने याजकांच्या गावांमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या वृद्ध आणि तरुण याजकांना त्यांच्या विभागानुसार वाटप करण्यासाठी मदत केली.