मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास २९:२९सुमारे इ.स.पू. ७२६

    जेव्हा अर्पणे करण्याचे संपले, तेव्हा राजा आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येकजणांनी गुडघे टेकले आणि आराधना केली.

  2. 2 इतिहास २९:३०सुमारे इ.स.पू. ७२६

    राजा हिज्कीयाह आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी लेवींना दावीद आणि संदेष्टा आसाफ यांच्या शब्दांमध्ये याहवेहची स्तुती करण्याचा आदेश दिला. म्हणून त्यांनी आनंदाने स्तुतिगीते गायली आणि खाली वाकून आराधना केली.

  3. 2 इतिहास २९:३१सुमारे इ.स.पू. ७२६

    तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली.

  4. 2 इतिहास २९:३२सुमारे इ.स.पू. ७२६

    तिथे जमलेल्या लोकांनी आणलेल्या होमार्पणांची संख्या सत्तर गोऱ्हे, शंभर मेंढे आणि दोनशे नरकोकरे होती; हे सर्व याहवेहसमोर होमार्पणासाठी आणले होते.

  5. 2 इतिहास २९:३३सुमारे इ.स.पू. ७२६

    बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते.

  6. 2 इतिहास २९:३४सुमारे इ.स.पू. ७२६

    तरीसुद्धा सर्व होमार्पणाची कातडी काढण्यासाठी याजक फारच कमी होते. म्हणून त्यांचे नातेवाईक लेवी लोकांनी त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर याजकांचे शुद्धीकरण होईपर्यंत मदत केली, कारण लेवी लोक स्वतःचे शुद्धीकरण करण्यामध्ये याजकांपेक्षा अधिक प्रामाणिक होते.

  7. 2 इतिहास २९:३५सुमारे इ.स.पू. ७२६

    शांत्यर्पणाची चरबी आणि पेयार्पणे यांच्याबरोबरच होमार्पणे विपुल प्रमाणात होती. अशा रीतीने याहवेहच्या मंदिरातील सेवा पुन्हा प्रस्थापित झाली.

  8. 2 इतिहास २९:३६सुमारे इ.स.पू. ७२६

    परमेश्वराने त्यांच्या लोकांसाठी हे त्वरित सिद्धीस नेले होते, म्हणून हिज्कीयाह आणि सर्व लोक आनंदित झाले.

  9. 2 इतिहास ३०:१सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा.

  10. 2 इतिहास ३०:२सुमारे इ.स.पू. ७२६

    राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा.

  11. 2 इतिहास ३०:३सुमारे इ.स.पू. ७२६

    नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते.

  12. 2 इतिहास ३०:४सुमारे इ.स.पू. ७२६

    ही योजना योग्य आहे असे राजाला आणि संपूर्ण मंडळीला वाटले.

  13. 2 इतिहास ३०:५सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता.

  14. 2 इतिहास ३०:६सुमारे इ.स.पू. ७२६

    राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्‍यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील.

  15. 2 इतिहास ३०:७सुमारे इ.स.पू. ७२६

    तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात.

  16. 2 इतिहास ३०:८सुमारे इ.स.पू. ७२६

    तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल.

  17. 2 इतिहास ३०:९सुमारे इ.स.पू. ७२६

    जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”

  18. 2 इतिहास ३०:१०सुमारे इ.स.पू. ७२६

    संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.

  19. 2 इतिहास ३०:११सुमारे इ.स.पू. ७२६

    तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले.

  20. 2 इतिहास ३०:१२सुमारे इ.स.पू. ७२६

    याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता.

  21. 2 इतिहास ३०:१३सुमारे इ.स.पू. ७२६

    दुसऱ्या महिन्यामध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेममध्ये बरेच लोक एकत्र आले.

  22. 2 इतिहास ३०:१४सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यांनी यरुशलेममधील वेद्या काढून टाकल्या आणि धूपाच्या वेद्यांची जागा मोकळी केली आणि त्या किद्रोन खोऱ्यात फेकून दिल्या.

  23. 2 इतिहास ३०:१५सुमारे इ.स.पू. ७२६

    वल्हांडणाचा कोकरा त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापला. याजकांना आणि लेवीय लोकांना स्वतःची लाज वाटली आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले आणि याहवेहच्या मंदिरात होमार्पणे आणली.

  24. 2 इतिहास ३०:१६सुमारे इ.स.पू. ७२६

    नंतर त्यांनी परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची नियमित पदे स्वीकारली. लेव्यांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.

  25. 2 इतिहास ३०:१७सुमारे इ.स.पू. ७२६

    जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला.