मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास २९:४सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याने याजकांना आणि लेवींना आणले आणि त्यांना पूर्व बाजूला असलेल्या चौकात एकत्र जमविले.

  2. 2 इतिहास २९:५सुमारे इ.स.पू. ७२६

    आणि म्हणाला: “लेवींनो, माझे ऐका! आता तुम्ही स्वतःला पवित्र करा आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर यांचे मंदिर पवित्र करा. सर्व अशुद्धता या पवित्रस्थानातून काढून टाका.

  3. 2 इतिहास २९:६सुमारे इ.स.पू. ७२६

    आमचे पालक अविश्वासू होते; त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि त्यांचा त्याग केला. त्यांनी याहवेहच्या निवासस्थानापासून त्यांचे मुख फिरविले आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली.

  4. 2 इतिहास २९:७सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यांनी अंगणाचे दरवाजे बंद केले आणि दिवे विझविले. त्यांनी धूप जाळला नाही किंवा त्या पवित्रस्थानात इस्राएलच्या परमेश्वराला कोणतेही होमार्पण दिले नाही.

  5. 2 इतिहास २९:८सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यामुळेच याहवेहचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला आहे; त्यांनी त्यांना भयप्रद व दहशत निर्माण करणारे आणि तिरस्काराचा विषय असे केले आहे, जसे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता.

  6. 2 इतिहास २९:९सुमारे इ.स.पू. ७२६

    याकारणामुळेच आपले पूर्वज तलवारीने मारले गेले आणि आपले पुत्र आणि कन्या आणि आपल्या स्त्रिया बंदिवासात ठेवलेल्या आहेत.

  7. 2 इतिहास २९:१०सुमारे इ.स.पू. ७२६

    आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल.

  8. 2 इतिहास २९:११सुमारे इ.स.पू. ७२६

    माझ्या मुलांनो, आता निष्काळजी राहू नका, कारण याहवेहनी तुम्हाला त्यांच्यासमोर उभे राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे सेवक होण्यासाठी आणि धूप जाळण्यासाठी निवडले आहे.”

  9. 2 इतिहास २९:१२सुमारे इ.स.पू. ७२६

    तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली: कोहाथी वंशातील: अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल; मरारी वंशातील: अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्‍याह; गेर्षोनी वंशातील: जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन;

  10. 2 इतिहास २९:१३सुमारे इ.स.पू. ७२६

    एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्‍याह आणि मत्तन्याह;

  11. 2 इतिहास २९:१४सुमारे इ.स.पू. ७२६

    हेमानच्या वंशातील: यहीएल आणि शिमी; यदूथूनच्या वंशातील: शमायाह आणि उज्जीएल.

  12. 2 इतिहास २९:१५सुमारे इ.स.पू. ७२६

    जेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या लेवींना एकत्र जमविले आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले, तेव्हा ते याहवेहच्या वचनाचे पालन करून, राजाज्ञेनुसार याहवेहच्या मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी मंदिरात गेले.

  13. 2 इतिहास २९:१६सुमारे इ.स.पू. ७२६

    याजक याहवेहच्या पवित्रस्थानात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आत गेले. त्यांना याहवेहच्या मंदिरात जे काही अशुद्ध सापडले ते सर्व त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या अंगणात आणले. लेव्यांनी ते घेतले आणि किद्रोन खोऱ्याकडे नेऊन फेकले.

  14. 2 इतिहास २९:१७सुमारे इ.स.पू. ७२६

    पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शुद्धीकरण सुरू केले आणि पहिल्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते याहवेहच्या मंदिराजवळ पोहोचले. आणखी आठ दिवस त्यांनी पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी काम पूर्ण करून याहवेहचे मंदिर पवित्र केले.

  15. 2 इतिहास २९:१८सुमारे इ.स.पू. ७२६

    मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत.

  16. 2 इतिहास २९:१९सुमारे इ.स.पू. ७२६

    राजा आहाज राजा असताना त्यांच्या अविश्वासूपणामध्ये त्यांनी काढून टाकलेल्या सर्व वस्तू आम्ही तयार केल्या आहेत आणि पवित्र केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता याहवेहच्या वेदीसमोर आहेत.”

  17. 2 इतिहास २९:२०सुमारे इ.स.पू. ७२६

    दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला.

  18. 2 इतिहास २९:२१सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यांनी सात गोर्‍हे, सात मेंढे, सात नरकोकरे आणि सात बोकडे हे राष्ट्राच्या पापार्पणासाठी, पवित्रस्थानासाठी आणि यहूदीयासाठी आणले. राजाने याजकांना, अहरोनाच्या वंशजांना हे सर्व याहवेहच्या वेदीवर अर्पण करण्यास सांगितले.

  19. 2 इतिहास २९:२२सुमारे इ.स.पू. ७२६

    तेव्हा त्यांनी गोर्‍ह्यांचा वध केला आणि याजकांनी रक्त घेऊन वेदीवर शिंपडले; नंतर त्यांनी मेंढ्यांची कत्तल केली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. त्यानंतर त्यांनी कोकऱ्यांचा वध केला आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.

  20. 2 इतिहास २९:२३सुमारे इ.स.पू. ७२६

    पापार्पणासाठी असलेले बोकड राजा आणि जमलेल्या मंडळीसमोर आणले आणि त्यांनी त्यांचे हात त्यांच्यावर ठेवले.

  21. 2 इतिहास २९:२४सुमारे इ.स.पू. ७२६

    याजकांनी नंतर बोकडांचा वध केला आणि त्यांचे रक्त सर्व इस्राएलसाठी प्रायश्चिताचे पापार्पण म्हणून वेदीवर अर्पण केले, कारण राजाने सर्व इस्राएलसाठी होमार्पण आणि पापार्पण करण्याची आज्ञा दिली होती.

  22. 2 इतिहास २९:२५सुमारे इ.स.पू. ७२६

    दावीद राजा, राजाचा संदेष्टा गाद आणि नाथान संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे झांजा, वीणा आणि तंतुवाद्ये घेऊन त्याने लेवींना याहवेहच्या मंदिरात ठेवले; अशी आज्ञा याहवेहनी त्यांच्या संदेष्ट्यांद्वारे दिली होती.

  23. 2 इतिहास २९:२६सुमारे इ.स.पू. ७२६

    म्हणून लेवीय लोक दावीदाची वाद्ये आणि याजक तुतारी घेऊन तयार उभे राहिले.

  24. 2 इतिहास २९:२७सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहने वेदीवर बलिदानांचे होमार्पण करण्याची आज्ञा दिली. अर्पण सुरू झाले तेव्हाच इस्राएलचा राजा दावीदाची वाद्ये आणि कर्ण्यांसह याहवेहसाठी गीते गाण्यास सुरुवात झाली.

  25. 2 इतिहास २९:२८सुमारे इ.स.पू. ७२६

    जमलेल्या संपूर्ण सभेतील लोकांनी वाकून आराधना केली, त्यावेळेस वादक वाद्य आणि कर्णे वाजवित होते. बलिदानांचे होमार्पण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सुरू होते.