- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास २६:१३सुमारे इ.स.पू. ८१०
त्यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी प्रशिक्षित झालेल्या पुरुषांचे सैन्य 3,07,500 होते, राजाला त्याच्या शत्रूविरुद्ध आधार देण्यासाठी ते एक शक्तिशाली सैन्य होते.
- 2 इतिहास २६:१४सुमारे इ.स.पू. ८१०
उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला.
- 2 इतिहास २६:१५सुमारे इ.स.पू. ८१०
यरुशलेममध्ये त्याने बुरुजावर आणि कोपऱ्यांवरील संरक्षणांसाठी वापर करण्यासाठी शोध लावलेली उपकरणे बनविली. ज्यामुळे सैनिक बाण मारू शकतील आणि भिंतीवरून मोठे दगड फेकू शकतील. त्याची किर्ती दूर पसरली, कारण तो सामर्थ्यशाली होईपर्यंत त्याला खूप मदत झाली होती.
- 2 इतिहास २६:१६सुमारे इ.स.पू. ८१०
परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला.
- 2 इतिहास २६:१७सुमारे इ.स.पू. ८१०
अजर्याह याजका बरोबर याहवेहचे इतर ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यामागे आले.
- 2 इतिहास २६:१८सुमारे इ.स.पू. ८१०
ते उज्जीयाह राजास भेटले आणि म्हणाले, “उज्जीयाह, याहवेहसाठी धूप जाळणे तुला योग्य नाही. धूप जाळण्यासाठी अहरोनाचे वंशज, याजकांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्या पवित्रस्थानातून बाहेर पड, कारण तू विश्वासू राहिला नाहीस आणि परमेश्वर याहवेह यांच्याकडून तुझा सन्मान केला जाणार नाही.”
- 2 इतिहास २६:१९सुमारे इ.स.पू. ८१०
उज्जीयाह धूप जाळण्यासाठी त्याच्या हातात धूपदान घेऊन तयार होता, तो याजकांवर रागावला. याहवेहच्या मंदिरातील धूपवेदीसमोर पुजाऱ्यांवर तो रागावत असताना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग आला.
- 2 इतिहास २६:२०सुमारे इ.स.पू. ८१०
जेव्हा अजर्याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते.
- 2 इतिहास २६:२१सुमारे इ.स.पू. ७६५
उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले.
- 2 इतिहास २६:२२सुमारे इ.स.पू. ७६५
उज्जीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याद्वारे लिहून ठेवल्या आहेत.
- 2 इतिहास २६:२३सुमारे इ.स.पू. ७५८
उज्जीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि राजांच्या मालकीच्या स्मशानभूमीत त्याला पुरण्यात आले, कारण लोक म्हणाले, “त्याला कुष्ठरोग झाला होता.” आणि त्याचा वारस त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
- 2 इतिहास २७:१सुमारे इ.स.पू. ७५३
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती.
- 2 इतिहास २७:२सुमारे इ.स.पू. ७५३
त्याचे पिता उज्जीयाहने जसे केले तसे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले; परंतु त्याने याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला नाही. तथापि लोकांनी त्यांचे भ्रष्ट व्यवहार सुरूच ठेवले.
- 2 इतिहास २७:३सुमारे इ.स.पू. ७५३
योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले.
- 2 इतिहास २७:४सुमारे इ.स.पू. ७५३
त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले.
- 2 इतिहास २७:५सुमारे इ.स.पू. ७५३
योथामाने अम्मोन्यांच्या राजाशी युद्ध करून त्यांना जिंकले. त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर तालांत चांदी, दहा हजार कोर गहू आणि दहा हजार कोर जव दिले. अम्मोनी लोकांनी दुसऱ्या आणि तिसर्या वर्षी देखील त्याच प्रमाणात वस्तू आणल्या.
- 2 इतिहास २७:६सुमारे इ.स.पू. ७५३
योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला.
- 2 इतिहास २७:७सुमारे इ.स.पू. ७५३
योथामच्या राज्यकाळातील इतर घटना, त्याने केलेली सर्व युद्धे आणि इतर गोष्टी इस्राएलचे राजे आणि यहूदीयाचे राजे यांच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत.
- 2 इतिहास २७:८सुमारे इ.स.पू. ७५३
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले.
- 2 इतिहास २७:९सुमारे इ.स.पू. ७५३
योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याचा पुत्र आहाज त्याचा वारस म्हणून राजा झाला.
- 2 इतिहास २८:१सुमारे इ.स.पू. ७४२
वयाच्या वीसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे पिता दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही.
- 2 इतिहास २८:२सुमारे इ.स.पू. ७४२
त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि पूजा करण्यासाठी बआल दैवतांच्या मूर्तीसुद्धा बनविल्या.
- 2 इतिहास २८:३सुमारे इ.स.पू. ७४२
त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.
- 2 इतिहास २८:४सुमारे इ.स.पू. ७४२
त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला.
- 2 इतिहास २८:५सुमारे इ.स.पू. ७४२
त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले. त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली.