- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास २५:१६सुमारे इ.स.पू. ८२७
तो बोलत असतानाच राजा त्याला म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार नेमला आहे का? थांब! का बरे तू मारला जावास?” तेव्हा तो संदेष्टा थांबला व म्हणाला, “मला माहीत आहे की परमेश्वराने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू असे केलेस आणि माझा सल्ला ऐकला नाहीस.”
- 2 इतिहास २५:१७सुमारे इ.स.पू. ८२६
यहूदीयाचा राजा अमस्याहने त्याच्या सल्लागारांशी सल्लामसलत केली, त्याने हे आव्हान इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाज याचा पुत्र यहोआश याच्याकडे पाठविले: “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.”
- 2 इतिहास २५:१८सुमारे इ.स.पू. ८२६
परंतु इस्राएलचा राजा योआश याने यहूदीयाचा राजा अमस्याह याला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले.
- 2 इतिहास २५:१९सुमारे इ.स.पू. ८२६
तू स्वतःला म्हणतोस की, तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि आता तू उद्धट व गर्विष्ठ झाला आहेस. परंतु घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश तू का करावा?”
- 2 इतिहास २५:२०सुमारे इ.स.पू. ८२६
परंतु अमस्याहने ऐकले नाही, कारण परमेश्वराने तसेच केले की, ते त्याला यहोआशच्या हाती सोपवून देणार होते, कारण त्यांनी एदोमाच्या दैवतांचा सल्ला घेतला होता.
- 2 इतिहास २५:२१सुमारे इ.स.पू. ८२६
तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. तो आणि यहूदीयाचा राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला.
- 2 इतिहास २५:२२सुमारे इ.स.पू. ८२६
इस्राएलने यहूदीयाचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले.
- 2 इतिहास २५:२३सुमारे इ.स.पू. ८२६
इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.
- 2 इतिहास २५:२४सुमारे इ.स.पू. ८२६
परमेश्वराच्या मंदिरातील सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, जी ओबेद-एदोमच्या देखरेखीखाली होते. आणि राजवाड्याच्या तिजोरीसह कैद्यांना घेऊन तो शोमरोनास परतला.
- 2 इतिहास २५:२५सुमारे इ.स.पू. ८२५
इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र योआश याच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा अमस्याह पंधरा वर्षे जगला.
- 2 इतिहास २५:२६सुमारे इ.स.पू. ८२५
अमस्याहच्या राज्यकाळातील इतर घटना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, यहूदीयाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीत काय?
- 2 इतिहास २५:२७सुमारे इ.स.पू. ८१०
अमस्याह याहवेहचे अनुसरण करण्यापासून दूर गेला, तेव्हापासून त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.
- 2 इतिहास २५:२८सुमारे इ.स.पू. ८१०
त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यहूदीयाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.
तेव्हा यहूदीयाच्या सर्व लोकांनी उज्जीयाहला घेतले, जो सोळा वर्षांचा होता, त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा म्हणून निवडले.
अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता.
- 2 इतिहास २६:३सुमारे इ.स.पू. ८१०
उज्जीयाह राजा झाला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.
- 2 इतिहास २६:४सुमारे इ.स.पू. ८१०
त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
- 2 इतिहास २६:५सुमारे इ.स.पू. ८१०
जखर्याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.
- 2 इतिहास २६:६सुमारे इ.स.पू. ८१०
तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली.
- 2 इतिहास २६:७सुमारे इ.स.पू. ८१०
परमेश्वराने त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध आणि गुर-बाल येथे राहणार्या अरब लोकांविरुद्ध आणि मऊनीमी लोकांविरुद्ध लढण्यास मदत केली.
- 2 इतिहास २६:८सुमारे इ.स.पू. ८१०
अम्मोनी लोकांनी उज्जीयाहकडे खंडणी आणली आणि त्याची किर्ती इजिप्तच्या सीमेपर्यंत पसरली, कारण तो खूप शक्तिशाली झाला होता.
- 2 इतिहास २६:९सुमारे इ.स.पू. ८१०
उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली.
- 2 इतिहास २६:१०सुमारे इ.स.पू. ८१०
त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती.
- 2 इतिहास २६:११सुमारे इ.स.पू. ८१०
उज्जीयाहकडे एक प्रशिक्षित सैन्य होते, हनन्याह हा राजेशाही अधिकाऱ्यांपैकी एक होता, याच्या मार्गदर्शनाखाली सचिव ईयेल आणि मासेयाह या अधिकाऱ्याने जमविलेल्या संख्येनुसार विभाग करून ते युद्ध करण्यास सुसज्जित होते.
- 2 इतिहास २६:१२सुमारे इ.स.पू. ८१०
योद्धे पुरुषांच्या कुटुंब प्रमुखांची एकूण संख्या 2,600 होती.