मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास २३:१४सुमारे इ.स.पू. ८७८

    यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्‍यांना बाहेर पाठवले, आणि त्यांना सांगितले: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारू नये.”

  2. 2 इतिहास २३:१५सुमारे इ.स.पू. ८७८

    म्हणून ती राजवाड्याच्या मैदानात, घोड्यांच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे त्यांनी तिला ठार मारले.

  3. 2 इतिहास २३:१६सुमारे इ.स.पू. ८७८

    मग यहोयादाने एक करार केला की तो, लोक आणि राजा याहवेहची प्रजा असणार.

  4. 2 इतिहास २३:१७सुमारे इ.स.पू. ८७८

    सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून टाकल्या आणि बआलचा याजक मत्तान याचा वेदीसमोर वध केला.

  5. 2 इतिहास २३:१८सुमारे इ.स.पू. ८७८

    नंतर दावीदाने ज्यांची मंदिरात होमार्पणे करण्यासाठी नेमणूक केली होती, त्या याजकीय लेव्यांच्या हाती यहोयादाने याहवेहच्या मंदिराची देखरेख सोपविली. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, दावीदाने सांगितल्याप्रमाणे ते आनंद करीत होते आणि गाणी गात होते.

  6. 2 इतिहास २३:१९सुमारे इ.स.पू. ८७८

    त्याने याहवेहच्या मंदिराच्या वेशींवर द्वारपालसुद्धा नेमले, ज्यामुळे कोणत्याही प्रकाराने अशुद्ध व्यक्तीने प्रवेश करू नये.

  7. 2 इतिहास २३:२०सुमारे इ.स.पू. ८७८

    त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, लोकांचे राज्यकर्ते आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले. ते वरच्या दरवाज्याने राजवाड्यात गेले आणि राजाला राजासनावर बसविले.

  8. 2 इतिहास २३:२१सुमारे इ.स.पू. ८७८

    राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.

  9. 2 इतिहास २४:१सुमारे इ.स.पू. ८७८

    जेव्हा योआश राजा झाला तेव्हा तो सात वर्षांचा होता. आणि त्याने चाळीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिबियाह होते; ती बेअर-शेबा येथील होती.

  10. 2 इतिहास २४:२सुमारे इ.स.पू. ८७८

    यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले.

  11. 2 इतिहास २४:३सुमारे इ.स.पू. ८७८

    यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या.

  12. 2 इतिहास २४:४सुमारे इ.स.पू. ८५६

    काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले.

  13. 2 इतिहास २४:५सुमारे इ.स.पू. ८५६

    त्याने याजकांना आणि लेवींना एकत्र बोलाविले आणि त्यांना सांगितले, “यहूदीयाच्या गावांकडे जा आणि तुमच्या परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी सर्व इस्राएल लोकांकडून वार्षिक देय रक्कम गोळा करा. आताच हे करा.” परंतु लेवी लोकांनी त्यावर तत्काळ हालचाल केली नाही.

  14. 2 इतिहास २४:६सुमारे इ.स.पू. ८५६

    तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “याहवेहचा सेवक मोशे आणि इस्राएलच्या सभेचे लोक यांनी लावलेला करार नियमांच्या तंबूसाठी लावलेला कर यहूदीया आणि यरुशलेममधून आणण्याची मागणी तुम्ही लेवींकडे का केली नाही?”

  15. 2 इतिहास २४:७सुमारे इ.स.पू. ८५६

    आता अथल्याह या दुष्ट स्त्रीच्या मुलांनी परमेश्वराचे मंदिर तोडून त्यात प्रवेश केला होता आणि याहवेहच्या घराच्या सर्व पवित्र वस्तूंचा सुद्धा बआल दैवतांसाठी वापर केला होता.

  16. 2 इतिहास २४:८सुमारे इ.स.पू. ८५६

    राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली.

  17. 2 इतिहास २४:९सुमारे इ.स.पू. ८५६

    तेव्हा यहूदीया आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा देण्यात आली की, परमेश्वराचा सेवक मोशे याने अरण्यात इस्राएलचा जो कर मागितला होता तो त्यांनी याहवेहकडे आणावा.

  18. 2 इतिहास २४:१०सुमारे इ.स.पू. ८५६

    सर्व अधिकारी आणि सर्व लोकांनी आनंदाने त्यांची वर्गणी आणली आणि ती पेटी पूर्ण भरेपर्यंत त्यात टाकत राहिले.

  19. 2 इतिहास २४:११सुमारे इ.स.पू. ८५६

    जेव्हाही लेवी लोकांद्वारे पेटी राजाच्या अधिकाऱ्यांकडे आणली जात होती आणि त्यांनी पाहिले की, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे होते, तेव्हा राजेशाही सचिव आणि मुख्य याजकाचा अधिकारी येत असत आणि पेटी रिकामी करीत आणि पुन्हा ती पेटी घेऊन तिच्या जागेवर ठेवीत. त्यांनी हे नियमितपणे केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले.

  20. 2 इतिहास २४:१२सुमारे इ.स.पू. ८५६

    राजा आणि यहोयादा यांनी ते याहवेहच्या मंदिरासाठी आवश्यक ते काम करणाऱ्यांना दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि सुतार आणि लोखंडी आणि कास्यकाम करणारे कामगार ठेवले.

  21. 2 इतिहास २४:१३सुमारे इ.स.पू. ८५६

    कामाची जबाबदारी सांभाळणारे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या हाताखाली दुरुस्तीचे काम चालू होते. त्यांनी परमेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ रचनेनुसार पुन्हा बांधले आणि ते भरभक्कम केले.

  22. 2 इतिहास २४:१४सुमारे इ.स.पू. ८५६

    जेव्हा त्यांनी ते काम संपविले, त्यांनी उरलेले पैसे राजा आणि यहोयादा यांच्याकडे आणले आणि त्यातून याहवेहच्या मंदिरासाठी वस्तू बनविल्या: विधीसाठी आणि होमार्पणासाठी वस्तू, आणि ताटेसुद्धा व सोन्या-चांदीच्या इतर वस्तू. जोपर्यंत यहोयादा जिवंत होता, तोपर्यंत याहवेहच्या मंदिरात निरंतर होमार्पण केले जात होते.

  23. 2 इतिहास २४:१५सुमारे इ.स.पू. ८४२

    यहोयादा आता पूर्ण वयस्कर झाला होता आणि तो वयाच्या एकशे तिसाव्या वर्षी मरण पावला.

  24. 2 इतिहास २४:१६सुमारे इ.स.पू. ८४२

    इस्राएलमध्ये परमेश्वरासाठी आणि त्यांच्या मंदिरासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे, त्याला दावीदाच्या नगरात राजांबरोबर पुरण्यात आले.

  25. 2 इतिहास २४:१७सुमारे इ.स.पू. ८४२

    यहोयादाच्या मृत्यूनंतर, यहूदीयाचे अधिकारी आले आणि त्यांनी राजाला आदरयुक्त वंदन केले आणि त्याने त्यांचे ऐकले.