- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास २०:३३सुमारे इ.स.पू. ९१४
तरी, डोंगरावरील मंदिरे नष्ट केली नव्हती आणि लोकांनी अजूनही त्यांची अंतःकरणे त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे लावली नव्हती.
- 2 इतिहास २०:३४सुमारे इ.स.पू. ९१४
यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या घटना हनानीचा पुत्र येहू याच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत, ज्याची नोंद इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात आहेत.
- 2 इतिहास २०:३५सुमारे इ.स.पू. ८९६
नंतर, यहूदीयाचा राजा यहोशाफाटने इस्राएलचा राजा अहज्याह याच्याशी मैत्री केली, ज्याचे मार्ग दुष्ट होते.
- 2 इतिहास २०:३६सुमारे इ.स.पू. ८९६
व्यापारी जहाजांच्या ताफ्यांची बांधणी करण्यासाठी तो त्याच्याशी सहमत झाला. नंतर ती एजिओन-गेबेर येथे बांधली गेली,
- 2 इतिहास २०:३७सुमारे इ.स.पू. ८९६
मारेशाहवासी दोदावाहूचा पुत्र एलिएजर याने यहोशाफाटविरुद्ध भविष्यवाणी केली, “तुम्ही अहज्याहशी युती केल्यामुळे, तुम्ही जे काय केले आहे त्याचा याहवेह नाश करतील.” ही जहाजे उद्ध्वस्त झाली आणि व्यापाराच्या प्रवासाला तार्शीशला घेऊन जाण्यासाठी ती सक्षम नव्हती.
- 2 इतिहास २१:१सुमारे इ.स.पू. ८८९
त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.
- 2 इतिहास २१:२सुमारे इ.स.पू. ८८९
यहोरामचे भाऊ अजर्याह, यहीएल, जखर्याह, अजर्याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते.
- 2 इतिहास २१:३सुमारे इ.स.पू. ८८९
त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि सोने, मौल्यवान वस्तू, तसेच यहूदीयामधील तटबंदीची शहरे दिली होती, परंतु त्याने यहोरामला राज्य दिले कारण तो त्याचा प्रथमपुत्र होता.
- 2 इतिहास २१:४सुमारे इ.स.पू. ८८९
जेव्हा यहोरामने त्याच्या वडिलांच्या राज्यावर स्वतःला ठामपणे प्रस्थापित केले, तेव्हा त्याने इस्राएलच्या काही अधिकाऱ्यांसह त्याच्या सर्व भावांना तलवारीने मारले.
- 2 इतिहास २१:५सुमारे इ.स.पू. ८९२
जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले.
- 2 इतिहास २१:६सुमारे इ.स.पू. ८९२
अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
- 2 इतिहास २१:७सुमारे इ.स.पू. ८९२
तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने दावीदाच्या घराण्याचा नाश केला नाही. कारण त्यांनी त्याच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.
- 2 इतिहास २१:८सुमारे इ.स.पू. ८८९
यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला.
- 2 इतिहास २१:९सुमारे इ.स.पू. ८८९
मग यहोराम आपले अधिकारी व सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. रात्रीच्या वेळी त्याने उठून ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, परंतु रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला.
- 2 इतिहास २१:१०सुमारे इ.स.पू. ८८९
आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहने बंड केले, कारण यहोरामने त्याच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता.
- 2 इतिहास २१:११सुमारे इ.स.पू. ८८९
त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते.
- 2 इतिहास २१:१२सुमारे इ.स.पू. ८८८
यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते: “तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही.
- 2 इतिहास २१:१३सुमारे इ.स.पू. ८८८
परंतु तुम्ही इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि अहाबाच्या घराण्याने जसे केले त्याप्रमाणे तुम्ही यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले आहे. तुम्ही स्वतःच्या भावांची, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची, तुमच्यापेक्षा चांगले असलेल्या पुरुषांचीही हत्या केली आहे.
- 2 इतिहास २१:१४सुमारे इ.स.पू. ८८८
तर आता याहवेह तुमच्या लोकांवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या स्त्रियांवर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर जोरदार प्रहार करणार आहेत.
- 2 इतिहास २१:१५सुमारे इ.स.पू. ८८८
तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.”
- 2 इतिहास २१:१६सुमारे इ.स.पू. ८८७
याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले.
- 2 इतिहास २१:१७सुमारे इ.स.पू. ८८७
त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता.
- 2 इतिहास २१:१८सुमारे इ.स.पू. ८८७
हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले.
- 2 इतिहास २१:१९सुमारे इ.स.पू. ८८७
याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते.
- 2 इतिहास २१:२०सुमारे इ.स.पू. ८८५
यहोराम राजा झाला तेव्हा तो बत्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. तो मरण पावला याचे कोणालाही दुःख वाटले नाही आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरला गेला, परंतु राजांच्या कबरेत पुरले नाही.