- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा धाकटा मुलगा अहज्याहला त्याच्या जागी राजा केले, कारण हल्ला करणारे जे लोक अरब लोकांबरोबर छावणीमध्ये आले होते त्यांनी सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता, म्हणून यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याहने राज्य करण्यास सुरुवात केली.
- 2 इतिहास २२:२सुमारे इ.स.पू. ८८५
वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, जी ओमरीची नात होती.
- 2 इतिहास २२:३सुमारे इ.स.पू. ८८५
तो सुद्धा अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण त्याच्या आईने त्याला दुष्टतेने वागण्यास प्रोत्साहन दिले.
- 2 इतिहास २२:४सुमारे इ.स.पू. ८८५
अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या अपयशाचे ते सल्लागार झाले.
- 2 इतिहास २२:५सुमारे इ.स.पू. ८८५
त्याने त्यांच्या सल्ल्याप्रमाणेसुद्धा केले जेव्हा तो अरामचा राजा हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र यहोराम च्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला;
- 2 इतिहास २२:६सुमारे इ.स.पू. ८८५
रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.
- 2 इतिहास २२:७सुमारे इ.स.पू. ८८५
अहज्याहची यहोरामाशी भेट यामधून परमेश्वराने अहज्याहचा नाश केला. जेव्हा अहज्याह तिथे आला तेव्हा तो योरामबरोबर निमशीचा पुत्र येहूला भेटण्यासाठी गेला, ज्याला अहाबाच्या घराण्याचा नाश करण्यासाठी याहवेह यांनी अभिषेक केला होता.
- 2 इतिहास २२:८सुमारे इ.स.पू. ८८५
येहू अहाबाच्या घराण्याचा न्यायनिवाडा करीत असताना, त्याला यहूदाहचे अधिकारी आणि अहज्याहकडे सेवा करण्याकरिता आलेले अहज्याहच्या नातेवाईकांची मुले भेटली तेव्हा त्याने त्यांना ठार मारले.
- 2 इतिहास २२:९सुमारे इ.स.पू. ८८५
त्यानंतर तो अहज्याहचा शोध घेत गेला आणि त्याच्या माणसांनी त्याला पकडले तेव्हा तो शोमरोनमध्ये लपला होता, त्याला येहूकडे आणण्यात आले आणि ठार मारण्यात आले. त्यांनी त्याला पुरले, कारण ते म्हणाले, “तो यहोशाफाटचा पुत्र होता, ज्याने त्याच्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचा सल्ला घेतला होता.” त्यामुळे अहज्याहच्या घरात राज्य टिकवून ठेवण्याइतके सामर्थ्य कोणातही नव्हते.
- 2 इतिहास २२:१०सुमारे इ.स.पू. ८८५
जेव्हा अहज्याहची आई अथल्याहने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती यहूदीयाच्या सर्व राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.
- 2 इतिहास २२:११सुमारे इ.स.पू. ८८५
परंतु यहोशेबा, यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही.
- 2 इतिहास २२:१२सुमारे इ.स.पू. ८८४
अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत त्याला परमेश्वराच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.
- 2 इतिहास २३:१सुमारे इ.स.पू. ८७८
सातव्या वर्षी यहोयादाने त्याचे सामर्थ्य दाखविले. त्याने शंभर तुकड्यांचे सरदार यांच्यासोबत करार केला: यरोहामचा पुत्र अजऱ्याह, यहोहानानचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजर्याह, अदायाहचा पुत्र मासेयाह आणि जिक्रीचा पुत्र अलीशाफाट.
- 2 इतिहास २३:२सुमारे इ.स.पू. ८७८
त्यांनी यहूदीयामध्ये सर्वत्र फिरून सर्व गावातून लेवी आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना एकत्र केले. जेव्हा ते यरुशलेमकडे आले,
- 2 इतिहास २३:३सुमारे इ.स.पू. ८७८
तेव्हा सर्व मंडळीने परमेश्वराच्या मंदिरात राजाबरोबर एक करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “याहवेहनी दावीदाच्या वंशजांविषयी वचन दिल्याप्रमाणे राजाचा पुत्र राज्य करेल.
- 2 इतिहास २३:४सुमारे इ.स.पू. ८७८
आता तुम्ही असे करावे: तुमच्यापैकी एकतृतीयांश याजक आणि लेवी जे शब्बाथ दिवशी कर्तव्य बजावत आहेत, त्यांनी दारांवर पहारा ठेवावा,
- 2 इतिहास २३:५सुमारे इ.स.पू. ८७८
तुमच्यापैकी एकतृतीयांश राजवाड्यात आणि एकतृतीयांश लोकांनी पायाभरणीचे प्रवेशद्वार आणि इतर सर्वांनी याहवेहच्या मंदिराच्या प्रांगणात असावे.
- 2 इतिहास २३:६सुमारे इ.स.पू. ८७८
कार्यासाठी नियुक्त केलेले याजक व लेवी हे शुद्ध केलेले आहेत म्हणून यांच्याशिवाय याहवेहच्या मंदिरात कोणी प्रवेश करू नये; परंतु प्रवेश करू नये ही याहवेहची आज्ञा इतर सर्वांनी पाळावी.
- 2 इतिहास २३:७सुमारे इ.स.पू. ८७८
प्रत्येक लेवींनी हातात शस्त्र घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”
- 2 इतिहास २३:८सुमारे इ.स.पू. ८७८
यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेवी आणि यहूदीयाच्या सर्व पुरुषांनी केले. प्रत्येकाने आपआपली माणसे घेतली; जे शब्बाथाच्या दिवशी सेवेला येणार होते आणि जे सेवा संपवून जात होते—कारण यहोयादा याजकाने कोणत्याही विभागांना सुट्टी दिली नव्हती.
- 2 इतिहास २३:९सुमारे इ.स.पू. ८७८
यहोयादा याजकाने परमेश्वराच्या मंदिरामधील दावीद राजाचे भाले व मोठ्या आणि लहान ढाली होत्या, त्या शताधिपतींच्या हाती दिल्या.
- 2 इतिहास २३:१०सुमारे इ.स.पू. ८७८
त्याने सर्व पुरुषांना प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे केले.
- 2 इतिहास २३:११सुमारे इ.स.पू. ८७८
मग यहोयादाने व त्याच्या पुत्रांनी राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्यांनी त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”
- 2 इतिहास २३:१२सुमारे इ.स.पू. ८७८
जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.
- 2 इतिहास २३:१३सुमारे इ.स.पू. ८७८
तिने बघितले राजा प्रवेशद्वाराच्या खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक हर्षोल्हास करीत कर्णे वाजवित आणि वादक त्यांच्या वाद्यांसह स्तुती करीत होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी, फितुरी!”