- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास २४:१८सुमारे इ.स.पू. ८४२
त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे मंदिर सोडून दिले, आणि अशेरा खांब आणि मूर्त्या यांची पूजा केली. त्यांच्या या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला.
- 2 इतिहास २४:१९सुमारे इ.स.पू. ८४२
जरी याहवेहनी लोकांना त्यांच्याकडे परत आणण्यासाठी संदेष्टे पाठवले आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली, तरी त्यांनी ऐकले नाही.
- 2 इतिहास २४:२०सुमारे इ.स.पू. ८४२
मग यहोयादा याजकाचा मुलगा जखर्याह याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला. तो लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “परमेश्वर, असे म्हणतात, ‘तुम्ही याहवेहच्या आज्ञांचे पालन का करीत नाही? तुमची भरभराट होणार नाही. कारण तुम्ही याहवेह यांना सोडले आहे, म्हणून त्याने तुमचा त्याग केला आहे.’ ”
- 2 इतिहास २४:२१सुमारे इ.स.पू. ८४२
परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले.
- 2 इतिहास २४:२२सुमारे इ.स.पू. ८४२
जखर्याहचे वडील यहोयादा याने त्याच्यावर जो दयाळूपणा केला होता त्याची राजा योआशाने आठवण केली नाही, परंतु त्याने त्याच्या पुत्राला ठार मारले, जो त्याच्या मरणाच्या अवस्थेत म्हणाला, “याहवेह हे पाहतील आणि तुला त्याचा हिशोब मागतील.”
- 2 इतिहास २४:२३सुमारे इ.स.पू. ८३९
वर्षाच्या शेवटी, अरामच्या सैन्याने योआशविरुद्ध युद्धासाठी कवायत केली; त्याने यहूदीया आणि यरुशलेमवर आक्रमण केले आणि लोकांच्या सर्व नेत्यांना ठार केले. त्यांनी लूट केलेला सर्व माल दिमिष्कातील त्यांच्या राजाकडे पाठवला.
- 2 इतिहास २४:२४सुमारे इ.स.पू. ८३९
जरी अरामी सैन्य थोडीच माणसे बरोबर घेऊन आले होते, तरी याहवेहनी त्यांच्या हाती पुष्कळ मोठे सैन्य दिले. कारण यहूदाहने त्यांच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेह यांना सोडले होते, योआशवर न्यायदंडाची कारवाई करण्यात आली.
- 2 इतिहास २४:२५सुमारे इ.स.पू. ८३९
जेव्हा अरामी लोक मागे फिरले, तेव्हा त्यांनी योआशला गंभीर जखमी करून सोडले. यहोयादा या याजकाच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांनी त्याला त्याच्या पलंगावर ठार मारले. म्हणून तो मरण पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले, परंतु राजांच्या कबरेत नव्हे.
- 2 इतिहास २४:२६सुमारे इ.स.पू. ८३९
ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा पुत्र.
- 2 इतिहास २४:२७सुमारे इ.स.पू. ८३९
त्याच्या पुत्राचा वृत्तांत, त्याच्याविषयीच्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेची नोंद राजांच्या पुस्तकावरील टिप्पणीत लिहिली आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अमस्याह हा राजा झाला.
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अमस्याह राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती.
त्याने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते ते केले, परंतु संपूर्ण अंतःकरणापासून नाही.
- 2 इतिहास २५:३सुमारे इ.स.पू. ८३८
राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला.
- 2 इतिहास २५:४सुमारे इ.स.पू. ८३८
परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, तर नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात जे लिहिले आहे, त्यानुसार वागले, याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरेल.”
- 2 इतिहास २५:५सुमारे इ.स.पू. ८२७
अमस्याहने यहूदीयाच्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सर्व यहूदाह आणि बिन्यामीनसाठी त्यांच्या कुटुंबांप्रमाणे हजारोंचे सेनापती आणि शंभराचे सेनापती नियुक्त केले. त्यानंतर त्याने वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकत्र केले आणि त्याला असे दिसून आले की लष्कराच्या सेवेसाठी योग्य असे तीन लाख पुरुष आहेत, भाला आणि ढाल हाताळण्यास ते सक्षम आहेत.
- 2 इतिहास २५:६सुमारे इ.स.पू. ८२७
त्याने शंभर तालांत चांदी देऊन इस्राएलमधून एक लाख लढाऊ माणसेसुद्धा भाड्याने घेतली.
- 2 इतिहास २५:७सुमारे इ.स.पू. ८२७
परंतु परमेश्वराचा एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “महाराज, इस्राएलकडून आलेल्या या सैन्याने तुमच्याबरोबर जाऊ नये, कारण याहवेह इस्राएलबरोबर नाहीत; एफ्राईमच्या कोणत्याही लोकांबरोबर नाहीत.
- 2 इतिहास २५:८सुमारे इ.स.पू. ८२७
जरी तुम्ही जाल आणि धाडसाने युद्ध कराल, तरी परमेश्वर तुम्हाला शत्रूसमोर उलथून पाडतील, कारण कोणाला मदत करावी किंवा कोणाला उलथून पाडावे यासाठी परमेश्वर सामर्थ्यशाली आहेत.”
- 2 इतिहास २५:९सुमारे इ.स.पू. ८२७
अमस्याहने परमेश्वराच्या मनुष्याला विचारले, “परंतु मी या इस्राएली सैन्यासाठी शंभर तालांत चांदी दिली आहेत त्याचे काय?” परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले, “याहवेह, तुम्हाला त्याच्यापेक्षाही अधिक देऊ शकतात.”
- 2 इतिहास २५:१०सुमारे इ.स.पू. ८२७
तेव्हा अमस्याहने एफ्राईमहून त्याच्याकडे जे सैन्य आले होते त्यांना काढून त्यांच्या घरी परत पाठविले. ते यहूदीयावर खूप रागावले आणि संतापाने घरी निघून गेले.
- 2 इतिहास २५:११सुमारे इ.स.पू. ८२७
अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले.
- 2 इतिहास २५:१२सुमारे इ.स.पू. ८२७
यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले.
- 2 इतिहास २५:१३सुमारे इ.स.पू. ८२७
दरम्यान, अमस्याहने ज्या सैन्याला परत पाठवले होते आणि युद्धात भाग घेऊ दिला नव्हता, त्यांनी शोमरोनपासून बेथ-होरोनपर्यंत तेथील यहूदीयाच्या नगरांवर हल्ला केला. त्यांनी तीन हजार लोकांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात लूट घेऊन गेले.
- 2 इतिहास २५:१४सुमारे इ.स.पू. ८२७
अमस्याह जेव्हा एदोमी लोकांचा वध करून परत आला, तेव्हा त्याने सेईरच्या लोकांची दैवते सोबत आणली, त्यांच्यापुढे लवून नमन केले आणि त्यांच्यासाठी होमार्पणे केली.
- 2 इतिहास २५:१५सुमारे इ.स.पू. ८२७
याहवेहचा राग अमस्याहवर भडकला आणि त्यांनी त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठविले, तो म्हणाला, “या लोकांच्या दैवतांचा तू सल्ला का घेतोस, जे स्वतःच्या लोकांना तुझ्या हातातून वाचवू शकले नाहीत?”