मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास १८:२८सुमारे इ.स.पू. ८९७

    यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले.

  2. 2 इतिहास १८:२९सुमारे इ.स.पू. ८९७

    इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला.

  3. 2 इतिहास १८:३०सुमारे इ.स.पू. ८९७

    आता अरामाच्या राजाने आपल्या रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”

  4. 2 इतिहास १८:३१सुमारे इ.स.पू. ८९७

    रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण यहोशाफाटने मोठ्याने धावा केला, आणि याहवेहने त्याला मदत केली. परमेश्वराने त्यांना त्याच्यापासून दूर नेले,

  5. 2 इतिहास १८:३२सुमारे इ.स.पू. ८९७

    आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.

  6. 2 इतिहास १८:३३सुमारे इ.स.पू. ८९७

    पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखत आणि कमरेचा पट्टा यामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.”

  7. 2 इतिहास १८:३४सुमारे इ.स.पू. ८९७

    तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि इस्राएलचा राजा संध्याकाळपर्यंत अराम्यांचा सामना करीत रथातच राहिला, आणि सूर्यास्ताच्या वेळी तो मरण पावला.

  8. 2 इतिहास १९:१सुमारे इ.स.पू. ८९६

    जेव्हा यहूदीयाचा राजा यहोशाफाट सुखरुपपणे त्याच्या राजवाड्यात यरुशलेम येथे परत आला,

  9. 2 इतिहास १९:२सुमारे इ.स.पू. ८९६

    तेव्हा हनानीचा पुत्र येहू संदेष्टा त्याला भेटण्यासाठी गेला आणि यहोशाफाट राजाला म्हणाला, “तुम्ही दुष्टाला मदत करावी आणि जे याहवेहचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करावे काय? याच कारणामुळे याहवेहचा क्रोध तुमच्यावर आहे.

  10. 2 इतिहास १९:३सुमारे इ.स.पू. ८९६

    कसेही असले तरी, तुमच्यामध्येही काही चांगले आहे, कारण तुम्ही अशेरा खांब देशातून काढून टाकले आहेत आणि परमेश्वराचा शोध घेण्याकडे तुमचे अंतःकरण लावले आहे.”

  11. 2 इतिहास १९:४सुमारे इ.स.पू. ८९६

    यहोशाफाट यरुशलेममध्ये राहिला आणि तो पुन्हा बेअर-शेबा पासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये गेला आणि त्यांना त्यांच्या याहवेह पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळविले.

  12. 2 इतिहास १९:५सुमारे इ.स.पू. ८९६

    त्याने यहूदीयाच्या प्रत्येक तटबंदीच्या शहरांमध्ये न्यायाधीशांची नेमणूक केली.

  13. 2 इतिहास १९:६सुमारे इ.स.पू. ८९६

    त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही काय करता ते नीट विचार करा, कारण तुम्ही केवळ मर्त्यांसाठी न्याय करीत नाही, परंतु याहवेहसाठी निर्णय घेता. जेव्हा तुम्ही जे काही करीत असता तेव्हा ते तुमच्याबरोबर आहेत.

  14. 2 इतिहास १९:७सुमारे इ.स.पू. ८९६

    आता याहवेहचे भय तुम्हावर असू द्या, काळजीपूर्वक न्याय करा, कारण आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे अन्याय किंवा पक्षपात किंवा लाचलुचपत असे काही चालत नाही.”

  15. 2 इतिहास १९:८सुमारे इ.स.पू. ८९६

    यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते.

  16. 2 इतिहास १९:९सुमारे इ.स.पू. ८९६

    त्याने त्यांना असे आदेश दिले: “तुम्ही याहवेहचे भय बाळगूनच विश्वासूपणाने आणि संपूर्ण अंतःकरणाने सेवा करावी.

  17. 2 इतिहास १९:१०सुमारे इ.स.पू. ८९६

    शहरात राहणाऱ्या तुमच्या लोकांकडून तुमच्यासमोर येणार्‍या प्रत्येक बाबतीत—मग तो रक्तपात असो किंवा कायद्याच्या संबंधात, आज्ञा, हुकूम किंवा नियम—तुम्ही याहवेहविरुद्ध पाप करू नका अशी ताकीद तुम्ही त्यांना द्यावी; नाहीतर त्यांचा राग तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर येईल. हे असे करा म्हणजे तुम्ही पातक करणार नाही.

  18. 2 इतिहास १९:११सुमारे इ.स.पू. ८९६

    “याहवेह संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर मुख्य याजक अमर्‍याह तुमच्यावर असेल आणि राजाच्या संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर यहूदीयाच्या वंशाचा प्रमुख इश्माएलचा मुलगा जबद्याह तुमच्यावर असेल आणि लेवी तुमच्यापुढे अधिकारी म्हणून काम करतील. धैर्याने वागा आणि जे चांगले काम करतात त्यांच्याबरोबर याहवेह असतील.”

  19. यानंतर, मोआबी आणि अम्मोनी सैन्य काही मऊनी लोकांना बरोबर घेऊन यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी आले.

  20. काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी).

  21. धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली.

  22. त्याप्रमाणे यहूदीयाचे लोक याहवेहची मदत घेण्यास एकत्र आले; निश्चितच, यहूदीयाच्या प्रत्येक शहरातील लोक त्यांच्या साहाय्यासाठी आले.

  23. नंतर यहोशाफाट याहवेहच्या मंदिराजवळ नवीन अंगणासमोर यहूदीया आणि यरुशलेम यांच्या सभेमध्ये उभा राहिला

  24. आणि म्हणाला: “याहवेह, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, तुम्ही स्वर्गातील परमेश्वर नाही का? तुम्ही राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर राज्य करता. सत्ता आणि सामर्थ्य तुमच्या हातात आहे, आणि कोणीही तुमचा सामना करू शकत नाही.

  25. आमच्या परमेश्वरा, या प्रदेशातील रहिवाशांना तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिले आणि तो प्रदेश तुमचे मित्र अब्राहामच्या वंशजांना कायमचा दिला नाही का?