मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास ३१:१६सुमारे इ.स.पू. ७२६

    त्या शिवाय त्यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना ज्यांची नावे वंशावळीच्या नोंदींमध्ये होती त्यांना वाटप केले, जे सर्व लोक त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या विभागानुसार त्यांची रोजची वेगवेगळी नेमून दिलेली सेवा पार पाडण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश करतील.

  2. 2 इतिहास ३१:१७सुमारे इ.स.पू. ७२६

    आणि त्यांनी त्यांच्या घराण्यांनी नोंदविलेल्या वंशावळीतील याजकांना आणि त्याचप्रमाणे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लेवींना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि विभागणी यानुसार वाटून दिल्या.

  3. 2 इतिहास ३१:१८सुमारे इ.स.पू. ७२६

    त्यांनी सर्व लहान मुले, स्त्रिया आणि संपूर्ण समाजातील पुत्र व कन्या यांचा या वंशावळीच्या नोंदीमध्ये समावेश केला. कारण स्वतःला पवित्र करण्यामध्ये ते प्रामाणिक होते.

  4. 2 इतिहास ३१:१९सुमारे इ.स.पू. ७२६

    याजक, जे अहरोनाचे वंशज होते ते त्यांच्या गावांच्या आसपासच्या शेतजमिनीवर किंवा इतर कोणत्याही नगरांमध्ये राहत होते, त्यांच्यातील प्रत्येक पुरुषाला आणि लेव्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांची नोंद झाली होती, त्या सर्वांना भागांचे वाटप करण्यासाठी नावानुसार पुरुष नेमले गेले.

  5. 2 इतिहास ३१:२०सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहने संपूर्ण यहूदीयामध्ये जे चांगले आणि योग्य होते तेच केले आणि त्याचे परमेश्वर याहवेहसमोर तो विश्वासू राहिला.

  6. 2 इतिहास ३१:२१सुमारे इ.स.पू. ७२६

    परमेश्वराच्या मंदिराचे जे काही सेवाकार्य त्याने हाती घेतले आणि नियम व आज्ञाचे पालन करण्यामध्ये त्याने त्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि संपूर्ण अंतःकरणापासून काम केले आणि त्यामुळे तो समृद्ध झाला.

  7. हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी.

  8. जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे,

  9. तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्‍यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली.

  10. त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?”

  11. नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.

  12. त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले:

  13. “बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे.

  14. त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.

  15. 2 इतिहास ३२:९सुमारे इ.स.पू. ७१०

    नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले:

  16. 2 इतिहास ३२:१०सुमारे इ.स.पू. ७१०

    “अश्शूरचा राजा सन्हेरीब असे म्हणतो: तुम्ही कशावर भरवसा टेकवून तुम्ही या वेढ्यात यरुशलेममध्ये राहिला आहात?

  17. 2 इतिहास ३२:११सुमारे इ.स.पू. ७१०

    जेव्हा हिज्कीयाह म्हणतो, ‘याहवेह आमचे परमेश्वर हे आम्हाला अश्शूरच्या राजाच्या हातातून वाचवतील,’ तर तुम्ही भुकेले आणि तहानलेले असे होऊन मरावे म्हणून तो तुमची दिशाभूल करत आहे.

  18. 2 इतिहास ३२:१२सुमारे इ.स.पू. ७१०

    हिज्कीयाहने स्वतःच या दैवताची उच्च स्थाने आणि वेद्या काढून टाकून यहूदीया आणि यरुशलेमला सांगितले नाही का की, ‘तुम्ही एकाच वेदीसमोर आराधना करावी आणि तिच्यावर होमार्पणे करावी?’

  19. 2 इतिहास ३२:१३सुमारे इ.स.पू. ७१०

    “तुम्हाला हे माहीत नाही का, की मी आणि माझ्या आधीच्या लोकांनी इतर देशातील सर्व लोकांचे काय केले? त्या राष्ट्रांच्या दैवतांनी कधीतरी माझ्या हातातून त्यांच्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?

  20. 2 इतिहास ३२:१४सुमारे इ.स.पू. ७१०

    माझ्या आधी या जागेवर काम करणाऱ्यांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला त्यांच्या सर्व दैवतांपैकी कोणीतरी त्याच्या लोकांना माझ्यापासून वाचवू शकले का? तर मग तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे बरे सोडवेल?

  21. 2 इतिहास ३२:१५सुमारे इ.स.पू. ७१०

    तर आता हिज्कीयाहने तुमची फसवणूक करू नये आणि तुमची अशाप्रकारे दिशाभूल करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही राष्ट्राचे किंवा राज्याचे कोणतेही दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून किंवा माझ्या पूर्वीच्या लोकांच्या हातातून सोडवू शकले नाही. तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे सोडवेल!”

  22. 2 इतिहास ३२:१६सुमारे इ.स.पू. ७१०

    सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले.

  23. 2 इतिहास ३२:१७सुमारे इ.स.पू. ७१०

    राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.”

  24. 2 इतिहास ३२:१८सुमारे इ.स.पू. ७१०

    तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले.

  25. 2 इतिहास ३२:१९सुमारे इ.स.पू. ७१०

    यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.