मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास ३३:१२सुमारे इ.स.पू. ६७७

    त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले.

  2. 2 इतिहास ३३:१३सुमारे इ.स.पू. ६७७

    आणि जेव्हा त्याने त्यांच्याकडे प्रार्थना केली, तेव्हा याहवेहना त्याच्या कळकळीच्या विनंतीमुळे दया आली आणि त्यांनी त्याची विनंती ऐकली; म्हणून त्यांनी त्याला यरुशलेम आणि त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा मनश्शेहला उमजले की, याहवेह हेच परमेश्वर आहेत.

  3. 2 इतिहास ३३:१४सुमारे इ.स.पू. ६७७

    नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले.

  4. 2 इतिहास ३३:१५सुमारे इ.स.पू. ६७७

    त्याने परकीय दैवते टाकून दिली आणि याहवेहच्या मंदिरातून मूर्ती काढून टाकली, तसेच मंदिराच्या टेकडीवर आणि यरुशलेममध्ये ज्या वेद्या त्याने बांधल्या होत्या त्या सर्व वेद्या काढल्या आणि त्या शहराबाहेर फेकून दिल्या.

  5. 2 इतिहास ३३:१६सुमारे इ.स.पू. ६७७

    नंतर त्याने याहवेहची वेदी पुनर्स्थापित केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्तुतीची अर्पणे केली आणि यहूदीयाला सांगितले की, त्यांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहचीच यांचीच सेवा करावी.

  6. 2 इतिहास ३३:१७सुमारे इ.स.पू. ६७७

    तरीसुद्धा लोकांनी उच्च स्थानावर जाऊन त्यांचे परमेश्वर याहवेह यांनाच अर्पणे करण्याचे कायम ठेवले.

  7. 2 इतिहास ३३:१८सुमारे इ.स.पू. ६९८

    मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने त्याच्या परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्या नावामध्ये संदेष्ट्यांनी सांगितलेली वचने ही इस्राएली राजांच्या पुस्तकात लिहिल्या आहेत.

  8. 2 इतिहास ३३:१९सुमारे इ.स.पू. ६९८

    त्याची प्रार्थना आणि त्याच्या कळकळीच्या विनवणीमुळे परमेश्वर दयेने कसे हेलावून गेले, तसेच त्याची सर्व पापे आणि अविश्वासूपणा आणि जिथे घटनास्थळे आहेत, तिथे त्याने उच्च स्थाने बांधली आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती स्थापित केल्या, स्वतःला नम्र करण्याआधी केलेल्या या सर्व गोष्टी संदेष्ट्यांच्या घटनांची नोंद यामध्ये लिहिलेल्या आहेत.

  9. 2 इतिहास ३३:२०सुमारे इ.स.पू. ६९८

    मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला.

  10. 2 इतिहास ३३:२१सुमारे इ.स.पू. ६४३

    वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले.

  11. 2 इतिहास ३३:२२सुमारे इ.स.पू. ६४३

    त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली.

  12. 2 इतिहास ३३:२३सुमारे इ.स.पू. ६४३

    परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले.

  13. 2 इतिहास ३३:२४सुमारे इ.स.पू. ६४१

    आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्या राजवाड्यात त्याची हत्या केली.

  14. 2 इतिहास ३३:२५सुमारे इ.स.पू. ६४१

    तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाह याला त्याच्या जागेवर राजा केले.

  15. 2 इतिहास ३४:१सुमारे इ.स.पू. ६४१

    वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले.

  16. 2 इतिहास ३४:२सुमारे इ.स.पू. ६४१

    याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याचे पूर्वज दावीदाच्या मार्गांचे पालन केले.

  17. 2 इतिहास ३४:३सुमारे इ.स.पू. ६३४

    त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली.

  18. 2 इतिहास ३४:४सुमारे इ.स.पू. ६३४

    त्याच्या मार्गदर्शनाखाली बआल दैवतांच्या वेद्या पाडण्यात आल्या; त्याने त्यावर ज्या धूपवेद्या होत्या, त्यांचे तुकडे केले आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती जमिनीवर पाडून फोडल्या. त्याचे बारीक तुकडे केले आणि ज्यांनी त्यांना बलिदान केले होते, त्यांच्या कबरेवर ते विखरून टाकले.

  19. 2 इतिहास ३४:५सुमारे इ.स.पू. ६३४

    याजकांची हाडे त्यांच्या वेदींवर जाळली आणि अशाप्रकारे त्याने यहूदीया आणि यरुशलेम यांचे शुद्धीकरण केले.

  20. 2 इतिहास ३४:६सुमारे इ.स.पू. ६३४

    मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये,

  21. 2 इतिहास ३४:७सुमारे इ.स.पू. ६३४

    वेद्या आणि अशेराचे स्तंभ मोडून टाकले आणि मूर्तींचा चुरा करून पूड केली आणि संपूर्ण इस्राएलमधून सर्व धूपवेद्यांचे तुकडे केले. नंतर तो यरुशलेमकडे परत गेला.

  22. 2 इतिहास ३४:८सुमारे इ.स.पू. ६२४

    योशीयाहच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, भूमी आणि मंदिर शुद्ध करण्यासाठी, त्याने अजल्याहचा पुत्र शाफान आणि त्या नगराचा अधिपती मासेयाह यांना, नोंद करणारा यहोआहाजचा पुत्र योवाहला त्याचे परमेश्वर याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी पाठविले.

  23. 2 इतिहास ३४:९सुमारे इ.स.पू. ६२४

    ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले.

  24. 2 इतिहास ३४:१०सुमारे इ.स.पू. ६२४

    नंतर त्यांनी ते याहवेहच्या मंदिराच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या माणसांच्या हाती सोपविले. या पुरुषांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणाऱ्या कामगारांना ते पैसे दिले.

  25. 2 इतिहास ३४:११सुमारे इ.स.पू. ६२४

    ज्या इमारती नाश होण्यासाठी यहूदीयाच्या राजांनी पडू दिल्या होत्या, त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी बांधकाम करणारे व सुतार यांना घडीव दगड आणि इमारतीचे वासे व तुळईची लाकडे खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे दिले.