मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास ३२:२०सुमारे इ.स.पू. ७१०

    राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली.

  2. 2 इतिहास ३२:२१सुमारे इ.स.पू. ७१०

    आणि याहवेह यांनी एक देवदूत पाठवला, त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व लढवय्ये, सेनापती आणि अधिकारी यांचा नाश केला. त्यामुळे तो अपमानित होऊन स्वतःच्या भूमीकडे मागे फिरला. आणि जेव्हा तो त्याच्या दैवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्या काही मुलांनी, जे त्याचे स्वतःचे रक्त आणि मांस होते, त्यांनी त्याला तलवारीने कापले.

  3. 2 इतिहास ३२:२२सुमारे इ.स.पू. ७१०

    अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला.

  4. 2 इतिहास ३२:२३सुमारे इ.स.पू. ७१०

    पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला.

  5. 2 इतिहास ३२:२४सुमारे इ.स.पू. ७१०

    त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली ज्यांनी त्याला उत्तर दिले आणि एक आश्चर्यकारक चिन्ह दिले.

  6. 2 इतिहास ३२:२५सुमारे इ.स.पू. ७१०

    परंतु हिज्कीयाहचे मन गर्विष्ठ होते आणि त्याच्यावर दाखविलेल्या दयेला त्याने अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्यावर आणि यहूदीया व यरुशलेमवर याहवेहचा कोप आला होता.

  7. 2 इतिहास ३२:२६सुमारे इ.स.पू. ७१०

    तेव्हा हिज्कीयाहने त्याच्या अंतःकरणातील गर्वाबद्दल पश्चात्ताप केला; तसेच यरुशलेमच्या लोकांनीसुद्धा केले; त्यामुळेच हिज्कीयाहच्या कार्यकालामध्ये याहवेहचा क्रोध त्यांच्यावर आला नाही.

  8. 2 इतिहास ३२:२७सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहकडे फार मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने त्याच्याकडे असलेले चांदी आणि सोने आणि मौल्यवान रत्ने, मसाले, ढाली आणि सर्वप्रकारच्या मौल्यवान वस्तूंसाठी भांडारे तयार केली.

  9. 2 इतिहास ३२:२८सुमारे इ.स.पू. ७२६

    हंगामाचे धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांचा साठा ठेवण्यासाठी त्याने इमारती बांधल्या; आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची गुरे आणि कळपांसाठी गोठे, मेंढवाडे बांधले.

  10. 2 इतिहास ३२:२९सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याने गावे विकसित केली आणि अधिक संख्येने गुरे मिळविली, कारण परमेश्वराने त्याला खूप मोठी संपत्ती दिली होती.

  11. 2 इतिहास ३२:३०सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहनेच गीहोन झर्‍याचा वर जाणारा मार्ग अडविला आणि पाण्याचा मार्ग दावीदाच्या नगरीच्या पश्चिमेकडे नेला. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो यशस्वी झाला.

  12. 2 इतिहास ३२:३१सुमारे इ.स.पू. ७१२

    परंतु त्या देशात घडलेल्या चमत्कारिक चिन्हाबद्दल त्याला विचारण्यासाठी बाबेलच्या राज्यकर्त्यांनी जेव्हा दूत पाठवले, तेव्हा परमेश्वराने त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या अंतःकरणातील सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्याला सोडून दिले.

  13. 2 इतिहास ३२:३२सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना व त्याच्या श्रद्धेचे कार्य आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याच्या दर्शनात त्याने लिहिलेल्या यहूदीयाच्या व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत.

  14. 2 इतिहास ३२:३३सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या वंशजांबरोबर डोंगरावरील कबरेत पुरण्यात आले. तो मरण पावला तेव्हा सर्व यहूदीया व यरुशलेमच्या लोकांनी त्याचा सन्मान केला. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.

  15. 2 इतिहास ३३:१सुमारे इ.स.पू. ६९३

    वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले.

  16. 2 इतिहास ३३:२सुमारे इ.स.पू. ६९३

    त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले.

  17. 2 इतिहास ३३:३सुमारे इ.स.पू. ६९३

    त्याचे वडील हिज्कीयाहने पाडून टाकलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; त्याने बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली.

  18. 2 इतिहास ३३:४सुमारे इ.स.पू. ६९३

    त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्यासाठी याहवेहने म्हटले होते, “यरुशलेमात माझे नाव सर्वकाळासाठी राहील.”

  19. 2 इतिहास ३३:५सुमारे इ.स.पू. ६९३

    याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या.

  20. 2 इतिहास ३३:६सुमारे इ.स.पू. ६९३

    बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, ज्योतिष आणि जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट अशा अनेक गोष्टी करून याहवेहचा राग पेटविला.

  21. 2 इतिहास ३३:७सुमारे इ.स.पू. ६९३

    जी कोरीव मूर्ती त्याने घडविली होती, ती त्याने घेतली व परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी परमेश्वर, दावीद व त्याचा पुत्र शलोमोन यांना म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.

  22. 2 इतिहास ३३:८सुमारे इ.स.पू. ६९३

    जर ते फक्त मोशेद्वारे दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी तुमच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांची पावले भटकू देणार नाही.”

  23. 2 इतिहास ३३:९सुमारे इ.स.पू. ६९३

    परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.

  24. 2 इतिहास ३३:१०सुमारे इ.स.पू. ६९३

    याहवेह मनश्शेह आणि त्याच्या लोकांशी बोलले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

  25. 2 इतिहास ३३:११सुमारे इ.स.पू. ६७७

    तेव्हा याहवेहनी अश्शूर राजाच्या सेनापतींना त्यांच्याविरुद्ध केले, त्यांनी मनश्शेहला कैद केले, त्याच्या नाकात आकडा घातला, त्याला कास्य धातूच्या बेड्यांनी बांधले आणि बाबेलला नेले.