मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा दावीद कोणत्याही प्रांतावर हल्ला करीत असे तो एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत सोडत नसे, परंतु तेथील मेंढरे, गुरे, गाढवे व उंट आणि वस्त्रे यांची लूट घेत असे. नंतर तो आखीशकडे परत आला.

  2. जेव्हा आखीशने विचारले, “आज तुम्ही कोणत्या प्रांतावर स्वारी केली?” दावीद त्याला उत्तर देत असे, “यहूदीयाच्या नेगेव विरुद्ध” किंवा “यरहमेल्यांच्या नेगेव विरुद्ध” किंवा “केनीयांच्या नेगेव विरुद्ध.”

  3. त्याने गथ येथे आणण्यासाठी एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नव्हते, कारण त्याला वाटले, “ते आमच्याबद्दल सांगतील आणि म्हणतील, ‘दावीदाने असे केले आहे.’ ” आणि जोपर्यंत तो पलिष्ट्यांच्या सीमेत राहिला तोपर्यंत तो असेच करीत असे.

  4. आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, “तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील.”

  5. त्या दिवसांमध्ये इस्राएलविरुद्ध युद्ध करावे म्हणून पलिष्ट्यांनी त्यांचे सैन्य एकत्र केले. आखीश दावीदाला म्हणाला, “तू हे खचित समज की, तू आणि तुझी माणसे माझ्याबरोबर सैन्यात येतील.”

  6. दावीद म्हणाला, “तर आपला दास काय करू शकतो, हे आपण पाहाल.” आखीशने उत्तर दिले, “फार चांगले, मी तुला आयुष्यभर माझा अंगरक्षक करेन.”

  7. याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्‍यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे.

  8. पलिष्टी सरदार आपआपल्या शंभराच्या आणि हजारांच्या तुकड्यांबरोबर निघाले आणि त्यांच्यामागे दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर चालू लागले.

  9. तेव्हा पलिष्ट्यांच्या सेनाधिकार्‍यांनी विचारले, “या इब्री लोकांचे येथे काय काम?” आखीशने उत्तर दिले, “हा दावीद नाही काय, जो इस्राएलचा राजा शौल याच्याकडे अधिकारी होता? तो आता एक वर्षाहून अधिक काळ माझ्याबरोबर आहे, आणि त्याने शौलाला सोडले तेव्हापासून आजपर्यंत, मला त्याच्यामध्ये काही दोष सापडला नाही.”

  10. हाच तो दावीद नाही काय, ज्याच्याविषयी नृत्य करताना त्यांनी गाईले: “ ‘शौलाने त्याच्या हजारांना मारले, आणि दावीदाने त्याच्या दहा हजारांना मारले?’ ”

  11. तेव्हा आखीशने दावीदाला बोलावून म्हटले, “जिवंत याहवेहची शपथ, तू विश्वसनीय आहेस आणि सैन्यामध्ये तू माझ्याबरोबर सेवा करावी यात मला आनंद आहे. ज्या दिवशी तू माझ्याकडे आलास तेव्हापासून आजपर्यंत मला तुझ्यामध्ये काही दोष सापडला नाही, परंतु सरदार तुला अनुमती देत नाहीत.

  12. दावीदाने आखीशला विचारले, “परंतु मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या दासामध्ये काही दोष आढळला आहे काय? माझ्या राजाच्या, मी जाऊन स्वामीच्या शत्रूशी का लढू नये?”

  13. आखीशने दावीदाला उत्तर दिले, “मला माहीत आहे तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा आहेस; परंतु पलिष्टी सेनापती म्हणतात, ‘त्याने आमच्याबरोबर युद्धास जाऊ नये.’

  14. तेव्हा दावीद आणि त्याची माणसे पहाटेच उठून पलिष्ट्यांच्या प्रदेशाकडे जाण्यासाठी निघाली आणि पलिष्टी सैन्य येज्रीलपर्यंत गेले.

  15. तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते,

  16. जेव्हा दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसून आले की, त्या शहराचा अग्नीने नाश झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले व मुली कैद करून नेलेली आहेत.

  17. तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही.

  18. दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते.

  19. दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.

  20. तेव्हा दावीद अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आणा.” तेव्हा अबीयाथारने ते त्याच्याकडे आणले,

  21. आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?” याहवेहने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, ते खात्रीने तुझ्या हाती लागतील आणि त्यांची सुटका करण्यात यश पावशील.”

  22. तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्‍याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले.

  23. त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.

  24. रस्त्याने जाता जाता, त्यांना एका शेतात इजिप्त देशाचा एक पुरुष भेटला. त्याला त्यांनी दावीदाकडे आणले. त्याला त्यांनी प्यायला पाणी व खायला भाकर दिली;

  25. दावीदाने त्याला विचारले, “तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास?” त्याने उत्तर दिले, “मी इजिप्त देशाचा असून अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपासून मी आजारी असल्यामुळे माझ्या धन्याने मला सोडून दिले.