- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
David
David चा उल्लेख असलेली वचने
तेव्हा दावीदाने याबेश-गिलआदवासियांकडे दूत पाठवून म्हटले, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो, कारण तुम्ही आपला धनी शौल यांना पुरून त्यांच्याप्रित्यर्थ दया दाखविली आहे.
शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले.
हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता.
जेरुइयाहचा पुत्र योआब आणि दावीदाची माणसे बाहेर पडली आणि गिबोनाच्या तळ्याकडे भेटली. एक गट तळ्याच्या एका बाजूला खाली बसला आणि दुसरा गट तळ्याच्या दुसर्या बाजूला बसला.
म्हणून ते उभे राहिले आणि त्यांची मोजणी करण्यात आली; बिन्यामीन आणि शौलाचा पुत्र इश-बोशेथ यांच्यातील बारा माणसे आणि बारा माणसे दावीदासाठी पुढे आले.
त्या दिवशी तीव्र युद्ध झाले आणि अबनेर व इस्राएली सैन्य यांचा दावीदाच्या माणसांनी पराभव केला.
नंतर योआबने अबनेरचा पाठलाग करण्याचे थांबविले आणि संपूर्ण सैन्याला एकत्र जमविले. असाहेल शिवाय दावीदाची एकोणवीस माणसे गहाळ होती.
परंतु दावीदाच्या माणसांनी अबनेर बरोबर असलेल्या तीनशे साठ बिन्यामीन लोकांना मारले होते.
शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले.
हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता;
आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाहपासून झाला.
दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता.
तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे!
याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराला तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत.
आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.”
नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.”
नंतर दावीदाने शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “माझी पत्नी मीखल मला दे, जिला मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा किंमत देऊन वाग्दत्त करून घेतली.”
अबनेरने इस्राएलच्या पुढार्यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती.
आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ”
अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले.
जेव्हा अबनेर त्याच्या बरोबरच्या वीस माणसांना घेऊन दावीदाकडे हेब्रोनास आला, तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी मेजवानी तयार केली.
तेव्हा अबनेर दावीदाला म्हणाला, “मी जाऊन माझ्या धनीराजासाठी सर्व इस्राएली लोकांना एकत्र करेन, यासाठी की त्यांनी तुमच्याबरोबर एक करार करावा, मग आपल्या मनास येईल त्यांच्यावर आपण राज्य करावे” तेव्हा दावीदाने अबनेरला रवाना केले आणि तो शांतीने गेला.
त्याचवेळेस दावीदाची माणसे आणि योआब छापा घालून परतले आणि आपल्याबरोबर मोठी लूट आणली. परंतु अबनेर दावीदाबरोबर हेब्रोनमध्ये नव्हता, कारण दावीदाने त्याला रवाना केले होते आणि तो शांतीने गेला होता.
नंतर योआब दावीदाकडून निघाला आणि त्याने अबनेरच्या मागे निरोप्यांना पाठवले आणि त्यांनी त्याला सिराहच्या विहिरीपासून परत आणले. परंतु दावीदाला हे माहीत नव्हते.
नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत.