मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला.

  2. नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!”

  3. त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे शिर. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”

  4. दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ,

  5. तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.

  6. इस्राएलच्या सर्व गोत्रांचे लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.

  7. जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

  8. दावीद तीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने चाळीस वर्षे राज्य केले.

  9. राजा आणि त्यांची माणसे यरुशलेममध्ये राहत असलेल्या यबूसी लोकांवर हल्ला करण्यासाठी निघाले. यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही; येथील आंधळे आणि लंगडेही तुम्हाला बाहेर हाकलून लावतील.” त्यांना वाटले, “दावीद येथे आत येऊ शकणार नाही.”

  10. तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.

  11. त्या दिवशी दावीदाने म्हटले होते, “जो कोणी यबूसी लोकांवर विजय मिळवील त्याने पाण्याच्या झोताकडून जाऊन ‘आंधळे व लंगडे’ अशा दावीदाच्या शत्रूंवर हल्ला करावा म्हणूनच असे म्हटले जाते, ‘आंधळे आणि लंगडे’ राजवाड्यात प्रवेश करणार नाहीत.”

  12. दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून आतील भागापर्यंत तट बांधले.

  13. आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्याबरोबर होते.

  14. आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले, त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे व सुतार आणि गवंडी पाठवले आणि त्यांनी दावीदासाठी एक राजवाडा बांधला.

  15. तेव्हा दावीदाने जाणले की, याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य उंच केले आहे.

  16. दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.

  17. इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो खाली गडाकडे गेला.

  18. तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.”

  19. तेव्हा दावीद बआल-पेरासीम येथे गेला आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे याहवेह माझ्या शत्रूंवर माझ्यासमोर तुटून पडले.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम हे नाव पडले.

  20. पलिष्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या तिथेच टाकून दिल्या आणि दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या आपल्याबरोबर नेल्या.

  21. तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले आणि त्यांनी उत्तर दिले, “सरळ वरती जाऊ नको, परंतु त्यांच्यामागून वळसा घे आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.

  22. तेव्हा दावीदाने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्याने पलिष्टी सैन्याला मारून टाकले.

  23. दावीदाने पुन्हा इस्राएलातील सर्व सक्षम तरुण माणसांना एकत्र आणले, ते तीस हजार होते.

  24. दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह येथून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले.

  25. दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर चिपळ्या, सनोवर लाकडापासून बनविलेले वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा वाजवित आनंद करीत होते.