- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
David
David चा उल्लेख असलेली वचने
दावीदाने विचारले, “छापा टाकलेल्या त्या टोळीकडे मला नेशील काय?” तो म्हणाला, “तुम्ही मला मारून टाकणार नाही किंवा मला माझ्या धन्याच्या स्वाधीन करणार नाही, अशी परमेश्वरापुढे शपथ घ्या, मग मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन.”
दावीद त्यांच्याशी त्या संध्याकाळपासून दुसर्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत लढला आणि त्यांच्यातील जे चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळाले त्यांच्याशिवाय एकही सुटला नाही.
दावीदाने आपल्या दोन स्त्रिया व अमालेकी लोकांनी जे सर्व लुटून नेले होते ते परत मिळविले.
लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली, लूट किंवा जे काही त्यांनी नेले त्यातील काहीही गहाळ राहिले नाही. दावीदाने सर्वकाही परत आणले.
त्याने सर्व मेंढरे व गुरे घेतली, आणि त्याच्या माणसांनी ती इतर पशूंच्या पुढे हाकीत नेत म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.”
नंतर जी दोनशे माणसे अतिशय थकल्यामुळे त्याच्याबरोबर जाऊ शकली नव्हती, आणि जे बेसोर खोर्याजवळ राहिले होते, त्यांच्याजळ दावीद आला. आणि ते दावीदाला व त्याच्याबरोबर असलेल्या माणसांना भेटायला बाहेर आले. दावीद व त्याची माणसे जवळ जाताच दावीदाने त्यांना अभिवादन केले.
परंतु दावीदाचे काही दुष्ट व त्रासदायक अनुयायी म्हणाले, “हे लोक आपल्याबरोबर आले नाही, म्हणून आपण सोडवून आणलेल्या लुटीतील वाटा त्यांना आम्ही देणार नाही. तथापि, त्यांनी त्यांच्या स्त्रिया व लेकरे घेऊन निघून जावे.”
तेव्हा दावीद म्हणाला, “नाही, माझ्या बंधूंनो! याहवेहने आपणास जे काही दिले आहे त्याचे आम्ही असे करू नये. याहवेहने आम्हाला सुरक्षित ठेवले आहे आणि छापा टाकलेली टोळी, आमचे शत्रू जे आमच्या विरोधात उठले त्यांना याहवेहने आमच्या हाती दिले.
दावीद जेव्हा सिकलाग येथे पोहोचला, तेव्हा त्याने लुटीतील काही भाग यहूदीयातील वडीलजनांस पाठवला आणि म्हटले, “याहवेहच्या शत्रूंच्या लुटीतून तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवित आहे.”
आणि हेब्रोन व इतर ठिकाणी जिथे तो व त्याची माणसे फिरत असे तेथील लोकांना दावीदाने त्या भेटी पाठविल्या.
शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला.
तिसर्या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले.
“तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.”
दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.”
तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?”
तेव्हा दावीदाने आणि त्याच्या बरोबरच्या माणसांनी आपली वस्त्रे धरली व फाडली.
नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.”
दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?”
तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांतील एकाला बोलाविले आणि म्हटले, “जा, त्याला मारून टाक!” तेव्हा त्याने त्याच्यावर वार केला आणि तो मनुष्य मरण पावला.
कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.”
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याविषयी दावीदाने हे विलापगीत रचले,
त्या दरम्यान, दावीदाने याहवेहला विचारले, “यहूदीयाच्या एखाद्या गावात मी जाऊ काय?” तेव्हा याहवेह म्हणाले, “जा.” दावीदाने विचारले, “मी कुठे जावे?” याहवेहने उत्तर दिले, “हेब्रोनास जा.”
तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला.
दावीद त्याच्या बरोबरच्या प्रत्येक माणसांना त्यांच्या कुटुंबासह घेऊन गेला आणि त्यांनी हेब्रोन व तेथील गावांमध्ये वस्ती केली.
तेव्हा यहूदीयातील माणसे हेब्रोनास आली व तिथे त्यांनी दावीदाचा यहूदाहच्या गोत्राचा राजा म्हणून अभिषेक केला. जेव्हा दावीदाला सांगण्यात आले की, ज्या लोकांनी शौलाला पुरले ते याबेश-गिलआदचे लोक होते,