मुख्य मजकुरावर जा

Temptation बद्दल बायबलमधील वचने

346 वचने · 52 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एका प्रसंगी एक नियमशास्त्र तज्ञ येशूंची परीक्षा पाहावी म्हणून आला, “गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्याकरिता मी काय करावे?”

  2. कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ”

  3. “तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या,

  4. अशा सेवकांसारखे असावे की, जे त्यांचा धनी लग्नाच्या मेजवानीवरून परत येईल म्हणून वाट पाहत आहेत, यासाठी की जेव्हा तो येतो आणि दार ठोठावतो त्याक्षणीच त्याच्यासाठी दार उघडावे.

  5. त्या सेवकांसाठी हे फारच चांगले असेल की, त्यांचा धनी येतो, तेव्हा ते जागे आहेत असे त्याला दिसून येते. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तो धनी स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी वस्त्रे घालेल आणि त्यांना मेजाभोवती मागे टेकून बसावयास सांगेल आणि तो येईल आणि त्यांना जेवण वाढेल.

  6. तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्‍या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल.

  7. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.

  8. “सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल.

  9. कारण संपूर्ण पृथ्वीवर राहणार्‍या सर्व लोकांवर तो येईल.

  10. पुढे घडणार्‍या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.”

  11. तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला.

  12. “शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे.

  13. परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.”

  14. तिथे पोहोचल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”

  15. “तुम्ही झोप का घेत आहात?” येशू त्यांना म्हणाले, “उठा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”

  16. संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता.

  17. “तुम्ही बहकविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे.

  18. कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल.

  19. तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे.

  20. तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका.

  21. तुमच्या शरीराचा कोणताही अवयव पाप करण्यासाठी दुष्टपणाचे साधन म्हणून सादर करू नका, परंतु त्याऐवजी मरणातून जिवंत झाल्यासारखे परमेश्वराला सादर करा; आणि आपला प्रत्येक अवयव नीतिमत्वाची साधने होण्याकरिता त्याला सादर करा.

  22. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून येथून पुढे पाप तुम्हावर स्वामित्व चालविणार नाही.

  23. आपण पापी स्वभावाच्या नियंत्रणात होतो, व ज्या कृत्यांचे फळ मरण आहे, ती करावयास आपल्या वासना नियमानुसार आपल्यामध्ये कार्य करीत होत्या.

  24. मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय?

  25. कारण असे लिहिले आहे: “तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो, वधाची प्रतीक्षा करणार्‍या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.”