मुख्य मजकुरावर जा

Temptation बद्दल बायबलमधील वचने

346 वचने · 52 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.

  2. तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये.

  3. मी जे तुम्हाला सांगतो ते प्रत्येकाला सांगत आहेः ‘सावध राहा!’ ”

  4. नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तू जागे राहू शकला नाही का?

  5. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”

  6. तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.”

  7. पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला.

  8. त्याला तिथे उभे असलेल्या दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा मनुष्य त्यांच्यापैकी एक आहे!”

  9. पेत्राने ते पुन्हा नाकारले. थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती. त्यातील काहीजण पेत्राला म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालील प्रांताचा आहेस!”

  10. हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.”

  11. पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले,

  12. तिथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली.

  13. सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”

  14. पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ”

  15. नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली.

  16. आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो.

  17. जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.”

  18. येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”

  19. मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,”

  20. कारण असे लिहिले आहे: “ ‘तुझे रक्षण व्हावे म्हणून तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल;

  21. तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.’ ”

  22. येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”

  23. या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला.

  24. खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात.

  25. काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत;